Pune News: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नाटकाला पुण्यात विरोध, गोंधळ घालत बंद पाडला प्रयोग

Sangeet Sannyast Khadga: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या 'संगीत संन्यस्त खड्ग' या नाटाकाच्या पुण्यातील प्रयोगाच्या दरम्यान गोंधळ झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Sangeet Sannyast Khadga: वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यावेळी आक्रमक झाले होते.
पुणे:

रेवती हिंगवे, प्रतिनिधी

Sangeet Sannyast Khadga: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या 'संगीत संन्यस्त खड्ग' या नाटाकाच्या पुण्यातील प्रयोगाच्या दरम्यान गोंधळ झाला. पुण्यातील कोथरुडमध्ये असलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या नाटकाचा पुण्यातील पहिला प्रयोग आज (शनिवार, 12 जुलै) होता. या प्रयोगाच्या दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.

या नाटकात गौतम बुद्धांच्या शांततेचा मार्ग चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आला, असा आरोप 'वंचित'च्या कार्यकर्त्यांनी केला. त्यांनी नाटक पूर्णपणे बंद पाडण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळी 6 वाजता हे नाटक सुरु झालं होतं. तब्बल अडीच तास हे नाटक चाललं. त्यानंतर गोंधळ सुरु झाला.

भाजपा खासदार मेधा कुलकर्णी या नाटकाच्या प्रयोगाला उपस्थित होत्या. त्यांनी आमच्या मागणीकडं दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला. कुलकर्णी यांनी या विषयावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. महापुरुषचा अपमान करणारं नाटक असल्याचा आरोप वंचितच्या कार्यकर्त्यांनी केला. हे नाटक चालू न देण्याचा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला. या नाटकात गौतम बुद्धांचा संदेश चुकीच्या पद्धतीनं दाखवला आहे, असा त्यांचा आरोप आहे. नाटकातील काही संवादावरही या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला.

(नक्की वाचा : Mumbai - Pune : मुंबई-पुणे प्रवासातील अर्धा तास कमी होणार, वाचा मिसिंग लिंक प्रकल्पाची वैशिष्ट्ये )
 

दरम्यान, हा गोंधळ सुरु झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या परिसरात पोलीस दाखल झाले. त्यांनी तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली.

Topics mentioned in this article