Sangli News :चंद्रग्रहणात 'नको' ते सर्व केलं; गर्भवतीच्या कृतीने सारेच भारावले, आता सर्वांकडून होतंय कौतुक

आज वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आहे. यादरम्यान विविध ज्योतिषाचार्यांकडून वेगवेगळे नियम सांगितले जातात.

जाहिरात
Read Time: 2 mins

Sangli News : आज वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आहे. यादरम्यान विविध ज्योतिषाचार्यांकडून वेगवेगळे नियम सांगितले जातात. सांगलीमधील एका कुटुंबाने अंधश्रद्धा मोडीत काढली आहे. (Lunar Eclipse 2026)

चंद्रग्रहण असो वा सूर्यग्रहण या ग्रहण काळामध्ये गर्भवतींना पाळायला लावणाऱ्या अनिष्ट रुढींना छेद देण्यासाठी सांगलीमध्ये अंनिसने "सोडा अंधश्रद्धेचे ग्रहण" हा उपक्रम राबवला. या उपक्रमांतर्गत एका महिलेने ग्रहण काळामध्ये भाजी चिरली आणि त्यानंतर फळे खाऊन जेवणही केले. ग्रहण काळामध्ये गर्भवती महिलेने भाजी चिरली तर बाळाचे ओठ फाटतात. या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या भ्रामक कल्पनेला सांगलीतील चांदणी प्रफुल थोरात या गर्भवती महिलेने आज छेद दिला.

चंद्रग्रहणात नको करू ते सर्व केलं...

दुपारी तीन वाजता ग्रहणाचे वेध सुरू झाल्यानंतर चांदणी थोरात या महिलेने भाजी चिरली. कात्रीने कागद कापले तसेच फळे कापून ती खाल्ली ही. गर्भातील बाळावर कोणत्याही अंधश्रद्धेचा नव्हे तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संस्कार व्हावा, यासाठी चांदणी थोरात यांनी हे पाऊल उचललं. सांगलीतील अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यांच्याच वहिनीने या उपक्रमाची सुरुवात केली. तसेच गर्भवती महिलेने भाजी चिरू नये, कात्रीने काही कापू नये, नाहीतर बाळाचे ओठ फाटतात या भ्रामक कल्पनांना चांदणी थोरात यांनी आज छेद दिला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.