Pune News: संत तुकाराम-ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखीचे वेळापत्रक जाहीर, पुण्यात कुठे-कुठे असणार मुक्काम?

आषाढी वारीसाठी अवघा महाराष्ट्र विठ्ठलमय झाला असून वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Ashadhi Wari 2026 Pune Timetable
पुणे:

सूरज कसबे, प्रतिनिधी 

Ashadhi Palkhi Timetable 2026 : आषाढी वारीसाठी अवघा महाराष्ट्र विठ्ठलमय झाला असून वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले आहे. यंदा संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 341 वे वर्ष असून दोन्ही प्रमुख पालख्यांचा प्रस्थान आणि मुक्कामाच्या तारखा निश्चित झाल्या आहेत.यंदा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे 7 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास 
देहू नगरीतून पंढरपूरच्या दिशेने ऐतिहासिक प्रस्थान होईल.

पालखी सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि मुक्काम

  • 7 जुलै 2026 (पहिला मुक्काम): इनामदार वाडा,देहू (पिंपरी-चिंचवड)
  • 8 जुलै 2026 (दुसरा मुक्काम): श्री विठ्ठल मंदिर,आकुर्डी (पिंपरी-चिंचवड)
  • 9 आणि 10 जुलै 2026 (तिसरा व चौथा मुक्काम):श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर, नाना पेठ (पुणे शहर)
  • 11 जुलै 2026 (पाचवा मुक्काम): कदम वाक वस्ती,लोणी काळभोर -नवीन पालखी तळ (पुणे ग्रामीण)
  • 12 जुलै 2026 (सहावा मुक्काम): श्री भैरवनाथ मंदिर,यवत (पुणे ग्रामीण)
  • 13 जुलै 2026 (सातवा मुक्काम): श्री विठ्ठल मंदिर,वरवंड (पुणे ग्रामीण)
  • 14 जुलै 2026 (आठवा मुक्काम): उंडवाडी गवळ्याची, पालखी तळ (पुणे ग्रामीण)
  • 15 जुलै 2026 (नववा मुक्काम): शारदा विद्यालय प्रांगण, बारामती (पुणे ग्रामीण)
  • 16 जुलै 2026 (दहावा मुक्काम): सणसर,पालखी तळ (पुणे ग्रामीण)
  • 17 जुलै 2026 (अकरावा मुक्काम):निमगाव केतकी,पालखी तळ (पुणे ग्रामीण)
  • 18 जुलै 2026 (बारावा मुक्काम): इंदापूर,पालखी तळ (पुणे ग्रामीण)
  • 19 जुलै 2026 (तेरावा मुक्काम): सराटी,पालखी तळ (पुणे ग्रामीण)

नक्की वाचा >> सीक्रेट चॅटिंग करणाऱ्यांची मज्जा,मेसेज वाचल्यावर कायमचा होणार गायब, WhatsApp चं नवं फिचर चक्रावून टाकणारं

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा

दुसरीकडे,माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान 8 जुलै 2026 रोजी आळंदीतून होणार आहे. एकूण 33 दिवसांच्या या पवित्र आणि भक्तीमय प्रवासानंतर हा सोहळा 8 ऑगस्ट रोजी पुन्हा आळंदीत परतणार आहे.

Advertisement

पुण्यातील मुक्कामाचा पेच अखेर  सुटला

गेल्या काही दिवसांपासून माऊलींच्या पुण्यातील मुक्कामावरून चर्चा आणि संभ्रम निर्माण झाला होता.मात्र,पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विठोबा मंदिरातील आवश्यक सुविधांबाबत लेखी हमीपत्र दिल्यानंतर यावर शिक्कामोर्तब झाले.झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पुण्यातील मुक्काम *भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरातच* करण्याचे निश्चित झाल्याने वारकरी आणि भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

नक्की वाचा >> Cockroach Janta Party ट्रेंडमध्ये, महाराष्ट्रातील झुरळे गोपीनाथ मंदिराचीही प्रचंड चर्चा, झुरळांना मानतात देव

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सुरुवातीचे मुख्य मुक्काम

  • 8 जुलै 2026 (पहिला मुक्काम):गांधी वाडा,आळंदी
  • 9 आणि 10 जुलै 2026 (दुसरा व तिसरा मुक्काम): श्री विठोबा मंदिर,भवानी पेठ (पुणे शहर)
  • 11 आणि 12 जुलै 2026 (चौथा व पाचवा मुक्काम): सासवड (पुणे ग्रामीण)
  • 13 जुलै 2026 (सहावा मुक्काम):जेजुरी (पुणे ग्रामीण)
  • 14 जुलै 2026 (सातवा मुक्काम):वाल्हे (पुणे ग्रामीण)
  • 15 जुलै 2026 (आठवा मुक्काम):लोणंद (पुणे ग्रामीण)
  •  16 जुलै 2026 (नववा मुक्काम):तरडगाव (पुणे ग्रामीण)

विशेष म्हणजे दोन्ही संतांच्या पालख्यांचे 9 आणि 10 जुलै रोजी पुणे शहरात (नाना पेठ आणि भवानी पेठ) दोन दिवसांचे वास्तव्य असणार आहे. या काळात पुणे शहर भक्तीरसात न्हाऊन निघणार असून प्रशासनानेही वारकऱ्यांच्या स्वागतासाठी आणि सुरक्षेसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे.