जाहिरात

सीक्रेट चॅटिंग करणाऱ्यांची मज्जा,मेसेज वाचल्यावर कायमचं होणार गायब, WhatsApp चं नवं फिचर चक्रावून टाकणारं

व्हाट्सअॅप एक जबरदस्त फिचरवर काम करत आहे. जे टेक्स्ट मॅसेजच्या जगाला पूर्णपणे बदलून टाकेल. हे नंव फिचर आल्यानंतर यूजर्स असे टेक्स्ट मॅसेज पाठवू शकतील,ज्यांना फक्त एकदाच पाहता येईल.

सीक्रेट चॅटिंग करणाऱ्यांची मज्जा,मेसेज वाचल्यावर कायमचं होणार गायब, WhatsApp चं नवं फिचर चक्रावून टाकणारं
WhatsApp View Once New Feature

WhatsApp New Feature : व्हाट्सअॅप एक जबरदस्त फिचरवर काम करत आहे. जे टेक्स्ट मॅसेजच्या जगाला पूर्णपणे बदलून टाकेल. हे नंव फिचर आल्यानंतर यूजर्स असे टेक्स्ट मॅसेज पाठवू शकतील,ज्यांना फक्त एकदाच पाहता येईल.समोरचा व्यक्ती जसं त्या मेसेजला वाचेल,तो चॅटमधून कायमस्वरूपी गायब होईल.

काय आहे व्हाट्सअॅपचं View-Once फिचर?

व्हाट्सअॅपवर फोटो,व्हिडीओ आणि ऑडियो फाईल्ससाठी 'View-Once'चा विकल्प आधीपासूनच उपलब्ध आहे. जेव्हा तुम्ही या फिचरच्या माध्यमातून एखादा फोटो किंवा व्हिडीओ पाठवता,तेव्हा रिसिव्हर त्याला सेव्ह,फॉरवर्ड किंवा स्क्रिनशॉट घेऊ शकत नाही. आता अशाप्रकारची एक्स्ट्रा प्रायव्हसी,टेक्स्ट मेसेजसाठी मिळणार आहे.व्हाट्सअॅपच्या अपडेटवर नजर ठेवणारी वेबसाईट WABetaInfo च्या माहितीनुसार,या फिचरला नुकतच एन्ड्रॉइडच्या लेटेस्ट बीटा अपडेट 2.26.22.7 वर पाहिलं गेलं आहे. जे Google Play Store वर उपलब्ध आहे.

नक्की वाचा >> Dombivli News: डोंबिवलीतील कुख्यात बिल्डर प्रफुल गोरेचा आणखी एक काळा कारनामा उघड, ग्राहकाची पोलिसांत धाव

कसं काम करणार हे नवं फिचर?

रिपोर्ट्सनुसार,टेक्स्ट मॅसेजसाठी या फिचरचा वापर करणं खूप सोपं आहे. जेव्हा तुम्ही कोणालाही मेसेज टाईप कराल,तेव्हा तुम्हाला सेंड बटनला थोड्या वेळासाठी दाबून Long-Press ठेवावं लागेल.असं केल्याने तुमच्या समोर एक ड्रॉपडाऊन मेन्यु  उघडेल. या मेन्युत तुम्हाला Send as view once चा एक नवीन विकल्प दिसेल.यावर क्लिक करताच तुमचा मेसेज व्यू वन्स मोडमध्ये जाईल. समोरचा व्यक्ती जसं या मेसेजला ओपन करेल,तो मेसेज त्याला फक्त एकदा दिसेल आणि नंतर गायब होईल.

कधीपर्यंत येणार ही अपडेट?

हे View-Once टेक्स्ट मेसेज फिचर सध्या डेव्हलोपमेंट स्टेजमध्ये आहे. कंपनीने आतापर्यंत याच्या रोलआऊटच्या ऑफिशियल तारखेची घोषणा केली नाही. येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये हे सर्वात आधी बीटा टेस्टर्ससाठी जारी केलं जाईल. त्यानंतर हे जगातील सर्व सामान्य यूजर्ससाठी रोलआऊट केलं जाईल.

नक्की वाचा >> Cockroach Janta Party ट्रेंडमध्ये, महाराष्ट्रातील झुरळे गोपीनाथ मंदिराचीही प्रचंड चर्चा, झुरळांना मानतात देव

प्रायव्हसीला आणखी मजबूत करण्यासाठी व्हाट्सअॅप आणखी एका मजेशीर फिचरची टेस्टिंग करत आहे. ज्याला 'Spoiler Messages' म्हटलं जातं. हे फिचरही तुमच्या संवेदनशील माहितीला सुरक्षीत ठेवण्यासाठी मदत करेल. या फिचरला ऑन केल्यानंतर तुम्ही एखादा मेसेज पाठवला,तर रिसिव्हरला ते टेक्स्ट एका ब्लर लाईनमध्ये लपलेला दिसेल. मेसेज पाहण्यासाठी त्या रिसिव्हरला त्यावर टॅप करावं लागेल. हे फिचर फोन नंबर,OTP किंवा कोणतीही सीक्रेट माहिती पाठवण्यासाठी खूप मदतशीर राहील. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com