Walmik Karad: वाल्मिक कराडच्या सुटकेवर 'या' दिवशी होणार युक्तीवाद, कोर्टात आज काय काय घडलं?

आरोपी वाल्मीक कराडची सर्व स्थावर मिळकत चल आणि अचल जप्तीसाठी अर्ज दिला होता.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुनावणी झाली. सरकारी वकील उज्वल निकम यांनी आरोप निश्चितीचा अर्ज सादर केला, तर वाल्मीक कराडच्या वकीलांनी डिजिटल पुरावे अद्याप न मिळाल्याचे सांगितले. पुढील सुनावणी 17 जूनला.

आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
बीड:

आकाश सावंत 

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी पक्षाचे वकील उज्वल निकम यांच्या उपस्थितीत आजचा 50 मिनटं युक्तिवाद झाला. देशमुख हत्या प्रकरणात आरोप निश्चिती बाबत पुरेसे पुरावे असून आरोप निश्चिती करून घ्यावी, असा अर्ज उज्वल निकम यांनी न्यायालयाला सादर केला. तर वाल्मीक कराडच्या वकीलाकडून अद्याप सरकारी पक्षाकडून डिजिटल एव्हिडन्स मिळाले नसल्याचं म्हणणे मांडण्यात आलं. तर वाल्मीक कराडच्या दोष मुक्तीचा अर्ज न्यायालयात प्रस्तावित केला आहे. या दोन्ही बाबींवर 17 जून रोजी सुनावणी होणार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सुनावणी वेळी काय घडलं?
आरोपींच्या वकिलांनी आम्ही डिस्चार्ज ॲप्लीकेशनवर अपयशी ठरलो तर पुढील प्रक्रिया करू असा युक्तीवाद केला आहे. अद्यापही डिजिटल ॲव्हिडन्स मिळाले नाहीत, असा आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केला आहे. बऱ्याच अर्जावर दोन्ही पक्षाचे म्हणणे बाकी आहे. डिस्चार्ज ॲप्लीकेशनवर तपास अधिकारी आणि सरकारी पक्षाचे म्हणणे आले आहे. त्यामुळे सरकारी पक्षाचे म्हणणे आहे की, आधी चार्ज फ्रेम म्हणणेवर सुनावणी घ्या. आज 50 मिनिटे सुनावणी झाली आहे. पुढील सुनावणी 17 जून रोजी होणार आहे. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्या मालमत्ता जप्तीचा अर्ज केला असल्याची माहिती आहे. पुढच्या सुनावणीवेळी कराडला दोषमुक्त करावे किंवा आरोप निश्चित करावे याबाबत 17 तारखेला पुढील युक्तिवाद होईल. 

ट्रेंडिंग बातमी-  Nashik News : आधी मुख्यमंत्र्यांची भेट, आता उघड नाराजी; सुधाकर बडगुजरांच्या मनात चाललंय काय?

वाल्मीक कराडचे वकिल काय म्हणाले 
आज सुनावणी झाली. डिस्चार्ज अप्लिकेशनवर सुनावणी अपेक्षित होती. पण ती झाली नाही. असं कराडचे वकील म्हणाले.  आज काही किरकोळ अर्जावर सरकारी पक्षाचे व आमचे म्हणणे मांडले गेले. इलेक्ट्रॉनिक्स पुरावे मागत होतो. ते कोर्टात सीलबंद पद्धतीने सादर करणार असल्याचं सरकारी पक्षाने सांगितले आहे. ज्यावेळेस पुरावे सादर करतील त्यावेळेस त्यावर चर्चा होईल. सरकारी पक्षाकडून विरोधी आरोपीच्या वकिलांना कागदपत्राची पूर्तता अद्याप झालेली नाही अशी कराडच्या वकिलाची माहिती आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Operation Sindoor: अखेर सत्य समोर! भारताकडून 20 नव्हे 28 क्षेत्र उद्ध्वस्त, पाकिस्तानची कबुली!

हा दिवस महत्वाचा ठरणार 
डिस्चार्ज ॲप्लीकेशनच्या सुनावणीला वेळ लागू शकतो. येणाऱ्या तारखेला कोर्टात इतर अर्ज जे पेंडीग आहेत त्यावर सुनावणी होणार आहे. डिस्चार्ज ॲप्लीकेशनवर सुनावणी घेण्याअगोदर इतर अर्जावर सुनावणी घ्या, असं कोर्टाचं निरीक्षण आहे. सरकारी पक्षाच्या वकिलाने मालमत्ता जप्ती संदर्भात अर्ज केले आहेत. कोर्टाच्या निरीक्षणानुसार 17 तारखेला इतर अर्जावर एकत्रितपणे सुनावणी होणार असल्याची माहिती वाल्मीक कराडचे वकील मोहन यादव यांनी दिली आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Basic Military Training : इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण; शालेय शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा

उज्ज्वल निकम नेमकं काय म्हणाले?
आरोपी वाल्मीक कराडची सर्व स्थावर मिळकत चल आणि अचल जप्तीसाठी अर्ज दिला होता. त्यांच्या वकिलांनी न्यायालयात उत्तर दिले आहे. त्यावर 17 तारखेला सुनावणी होईल. या खटल्यात मोकोकामधून दोषमुक्त करावे असा अर्ज कराड याचा होता. त्यावर न्यायालयात प्रस्तावीत केले आहे. त्याला दोषमुक्त करावे किंवा त्यावर आरोप निश्चित करावे, त्या प्रमाणे आम्ही निर्णय घ्यायचा, ते एकत्रित सुनावणीत घ्यावा असे म्हटले आहे. बचाव पक्षाने मोकोकामधून मुक्त करावे अशी मागणी केली आहे. आमची या बाबतच्या चौकशीवर हरकत नसल्याचे आम्ही म्हटले आहे. यावर 17 तारखेला युक्तिवाद होईल. केवळ वाल्मीक कराडनेच दोष मुक्तीचा अर्ज केला आहे, अशी माहिती देखील  उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.