सटाण्याच्या मजुरांवर गुजरातमध्ये काळाचा घाला, 3 ठार 5 जण जखमी

ट्रक चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला. त्यामुळे ट्रक पलटी झाला. यात तीन मजूर जागीच ठार झाले, तर 5 मजूर जखमी होते. बारडोली येथे हा भीषण अपघात झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins
नाशिक:

नाशिकच्या सटाणा तालुक्यातील डाळींब छाटणी मजुरावर गुजरातमध्ये काळाने घाला घातला आहे. भाजीपाला वाहतूक करणाऱ्या ट्रकने मजुर सुरतकडे जात होते. यावेळी ट्रक चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला. त्यामुळे ट्रक पलटी झाला. यात तीन मजूर जागीच ठार झाले, तर 5 मजूर जखमी होते. बारडोली येथे हा भीषण अपघात झाला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे मजूरांच्या हाताला काम नाही. नाशिकच्या सटाणा तालुक्यातही तिच स्थिती आहे. त्यामुळे सटाणा तालुक्यातील खामताणे परिसरातील मजुर मजुरीसाठी सुरतला निघाले होते. त्यावेळी हा भीषण अपघात झाला. या अपघातात पिंटू पिराजी पवार (40), सुनील एकनाथ मोरे (35), भाऊसाहेब प्रताप बागुल (50) हे खामणे येथील आदिवासी मजुर जागीच ठार झाले. तर सटाणा परिसरातील बाबाजी पवार, भाऊसाहेब पवार, आकाश माळी, तुळशीराम सोनवणे, दादा केरसानेकर हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळतातच  खामताणे व परिसरातील तरुणांनी गुजरातकडे धाव घेत अपघातातील जखमींना उपचारासाठी मदत केली. तर मृतांचे मृतदेह सटाणा येथे आणण्यात आले. रात्री उशिरा खामताणे येथे त्याच्यावर अंत्यसंसार करण्यात आले.   

Advertisement

हेही वाचा - भरधाव कारची 3 वर्षांच्या बाळासह तिघांना धडक, स्थानिकांनी गाडीची तोडफोड करत मद्यधुंद तरुणाला चोपले

अपघातात मृत्यूमुखी पडलेले सर्व जण भूमिहीन शेतमजुर आहेत. मिळेल ते काम करून ते आपल्या कुटुंबाचा गाडा चालवीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, लहान मुले असा परिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषांचे अपघातात निधन झाल्याने तिनही कुटुंबं उघड्यावर आले आहेत. अपघात स्थळावरून  एका ट्रक चालकाने सटाण्याचे भाजप आमदार दिलीप बोरसे यांना अपघाताची माहिती दिली. मदत करण्याचे आवाहन केले. त्यानंतर आमदार बोरसे यांनी घटनेचे गंभीर्य ओळखून तात्काळ बारडोलीचे भाजप आमदर ईश्वरभाई परमार यांच्याशी संपर्क केला. अपघातग्रस्ताना मदत करण्याची विनंती केली. त्यांनी तात्काळ यंत्रणा हलवून जखमीना  सुरत शासकीय रुग्णालयात दाखल करून  त्यांना वैद्यकीय मदत मिळवून दिली.

Advertisement

Advertisement