Saturday Bank Holiday: शनिवार, 23 ऑगस्टला बँका सुरू की बंद? बँकांमध्ये काम असणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती

Saturday Bank Holiday:  तुम्ही या शनिवारी म्हणजेच 23 ऑगस्ट 2025 रोजी बँकेत काही महत्त्वाच्या कामासाठी जाण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Saturday Bank Holiday: ऑगस्ट महिना हा विविध सार्वजनिक आणि धार्मिक सणांमुळे बँकांच्या सुट्ट्यांसाठी ओळखला जातो.
मुंबई:

Saturday Bank Holiday:  तुम्ही या शनिवारी म्हणजेच 23 ऑगस्ट 2025 रोजी बँकेत काही महत्त्वाच्या कामासाठी जाण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण 23 ऑगस्ट हा चौथा शनिवार असल्यामुळे बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे, देशभरातील सर्व बँकांच्या शाखा या दिवशी बंद राहतील.

ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्या

ऑगस्ट महिना हा विविध सार्वजनिक आणि धार्मिक सणांमुळे बँकांच्या सुट्ट्यांसाठी ओळखला जातो. या महिन्यात देशातील अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी बँका बंद होत्या. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या अधिकृत सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार, प्रत्येक राज्याच्या सुट्ट्यांमध्ये फरक असतो.

सुट्ट्यांमध्ये फरक का?

बँकांच्या सुट्ट्या देशभरात एकसारख्या नसतात. त्या राष्ट्रीय सुट्ट्या, प्रादेशिक सण, स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि राज्यांनुसार पाळल्या जाणाऱ्या परंपरांवर आधारित असतात. त्यामुळे, काही सुट्ट्या, जसे की स्वातंत्र्य दिन, देशभरात सारख्या असतात. पण रक्षाबंधन, जन्माष्टमी आणि इतर प्रादेशिक सणांमुळे केवळ विशिष्ट राज्यांमध्येच बँका बंद राहतात. म्हणूनच, एकाच दिवशी देशाच्या एका भागात बँका सुरू असू शकतात, तर दुसऱ्या भागात त्या बंद असतील.

( नक्की वाचा : Online Gaming Bill 2025: Dream11, MPL सह सर्वच 'पेड गेम्स' बंद, तुमच्या पैशांचं काय होणार? )
 

ग्राहकांसाठी महत्त्वाचा सल्ला

तुम्हाला बँकेत काही महत्त्वाचे व्यवहार करायचे असतील किंवा बँकेला भेट द्यायची असेल, तर तुमच्या राज्यासाठी किंवा शहरासाठी सुट्ट्यांचे वेळापत्रक तपासणे महत्त्वाचे आहे. यामुळे तुम्हाला गैरसोय होणार नाही.

Advertisement

डिजिटल सेवा सुरूच राहणार

शनिवार, 23 ऑगस्ट रोजी बँकांच्या शाखा बंद असल्या तरी, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. ग्राहक मोबाइल ॲप्स, इंटरनेट बँकिंग, UPI आणि ATM द्वारे त्यांच्या आवश्यक बँकिंग सेवांचा वापर अखंडितपणे करू शकतात. डिजिटल व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू राहतील.

( नक्की वाचा : Mobile Numerology : तुमचा मोबाईल नंबर सांगतो तुमचं भविष्य! लग्न ते आरोग्य सर्व प्रश्नांची मिळतील उत्तरं )
 

Topics mentioned in this article