
Mobile Number Numerology : भविष्याच्या पोटात काय दडलंय याची सर्वांनाच उत्सुकता असते. या उत्सुकतेमुळेच अनेक जण ज्योतिषांचा सल्ला घेतात. या सल्ल्यामुळे आपला फायदा झाला असा दावा करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. भारतीय ज्योतिषशास्त्राला मोठी मान्यता आहे. त्यामुळेच याचं महत्त्व देखील मोठं आहे.
पुण्यात 43 वे अखिल भारतीय ज्योतिष संमेलन भरलं आहे. या संमेलनासाठी देशभरातील ज्योतिषाचार्य पुण्यात जमा झाले आहेत. त्यांनी NDTV मराठी शी बोलताना ज्योतिष शास्त्र, तसंच भविष्यातील वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली.
मोबाईल नंबर सांगतो भविष्य
आजकाल प्रत्येकाकडंच मोबाईल असतो. हा रोजच्या आयुष्याचा मोठा भाग बनलाय. पण तुम्ही वापरत असलेल्या मोबाईलचा क्रमांक देखील तुमचं भविष्य सांगू शकतो असा विचार तुम्ही कधी केलाय का? पुण्यातील ज्योतिष संमेलनासाठी उपस्थित असलेल्या ज्योतिषाचार्य गौरी कैलास केंजळे यांनी हा दावा केलाय. त्यांनी 'NDTV मराठी' शी बोलताना याबाबतच्या एक महत्त्वाती माहिती दिली आहे. ही माहिती अनेकांसाठी नवीन आहे.
( नक्की वाचा : Sangli News : लग्नानंतर तब्बल 21 वर्षांनी झाला मुलगा, कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात सोडला... कारण काय? )
मोबाईल क्रमांक आणि भविष्य
गौरी केंजळे यांनी याबाबत एका प्रश्नाला उत्तर देताना 'NDTV मराठी' ला सांगितलं की, 'मोबाईल नंबरवरुन तुम्ही एखाद्याचं भविष्य सांगू शकता. मोबाईल नंबर बदलून त्याचं भविष्यही सुधारु शकता. समजा एखाद्याच्या मोबाईल नंबरमध्ये 1 आणि 6 हे अंक असतील तर ते थोडेसे लग्नाला उशीर करतात. त्यामुळे लग्न होण्यास त्रास होतो. त्यामुळे नात्यांमध्ये गोंधळ असू शकतो.
एखाद्याच्या मोबाईल नंबरमध्ये 75 हे कॉम्बिनेशन असेल तर या कॉम्बिनेशनमुळे ही व्यक्ती उत्तम वक्ता, लेखक असू शकते. ही व्यक्ती एखाद्याचं मन चांगल्या पद्धतीनं वळवू शकते. ती कौन्सिलिंगही उत्तम पद्धतीनं करेल.
मोबाईल नंबर पाहून एखाद्या व्यक्तीला काय अजार असेल हे सुद्धा आपण सांगू शकतो. एखाद्याच्या मोबाईल नंबरमध्ये 6 आणि 2 म्हणजेच 62 किंवा 26 असं कॉम्बिनेशन असेल तर या व्यक्तीला युरीनचा त्रास असू शकतो. त्याला त्वचेचाही त्रास असू शकतो.
या पद्धतीने मोबाईल नंबर बदलला तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी होण्यासाठी नाव आणि प्रसिद्धी मिळण्यासाठी तुम्ही मोबाईल नंबर बदलू शकता.
मला यासाठी रोज फोन येतात. मी दिवसाला साधारण 5 ते 6 मोबाईल नंबर बदलून देते. या विषयांवर आम्ही आमच्या संस्थेतही शिकवतो. हे पूर्ण शास्त्र ग्रहांच्यावर आधारित आहे. याच्या कॉम्बिनेशन्सनुसार उत्तरं मिळतात. काही वेळा तर लोकांचे अडकलेले पैसे देखील आपण मोबाईल नंबरनं सांगू शकतो.
आमची ज्योतिष संस्था आहे. त्या माध्यमातून हे शिकवलं जातं. अनेक सेलिब्रेटी देखील मोबाईल नंबर बदलून घेतात. इतकंच नाही तर काही आघाडीचे शास्त्रज्ञ आणि पोलीस अधिकारी देखील माझ्याकडं नंबर बदलून घेण्यासाठी आले आहेत, ' अशी माहिती केंजळे यांनी दिली.
स्पष्टीकरण : या बातमीतील विश्लेषण हे संबंधित तज्ज्ञांचे वैयक्तिक मत आहे. NDTV नेटवर्कचा याची कोणतीही हमी देत नाही. याचे अनुकरण करण्यापूर्वी संबधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. NDTV नेटवर्क याची जबाबदारी घेत नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world