खेळता-खेळता चक्कर येऊन कोसळला; जळगावात शाळेच्या पटांगणातच विद्यार्थ्याचा मृत्यू

घनश्याम हा अत्यंत गुणी विद्यार्थी होता. क्रीडा, नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम यासह शिक्षणातही अत्यंत हुशार होता. वडील शेतकरी असल्याने शिक्षणासह घनश्यामला शेतीचीही विशेष आवड होती.

जाहिरात
Read Time: 1 min

मंगेश जोशी, जळगाव

शाळेच्या पटांगणात चक्कर येऊन कोसळल्याने विद्यार्थाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातल्या अंमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयात ही घटना घडली आहे. घनश्याम जितेंद्र महाजन (15 वर्ष) असं मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. 

घनश्यान दुपारच्या सुमारास इतर विद्यार्थ्यांसोबत शाळेच्या पटांगणात खेळत होता. मात्र अचानक घनश्यामला अचानक चक्कर आल्याने तो पटांगणातच कोसळला. याबाबत इतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांना माहिती दिल्यानंतर शिक्षकांनी तात्काळ घनश्यामला खाजगी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान खाजगी रुग्णालयातून त्याला ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. 

घनश्याम हा अत्यंत गुणी विद्यार्थी होता. क्रीडा, नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम यासह शिक्षणातही अत्यंत हुशार होता. वडील शेतकरी असल्याने शिक्षणासह घनश्यामला शेतीचीही विशेष आवड होती. शाळेनंतर वडिलांना तो शेती कामातही मदत करायचा.

Advertisement

एकुलता एक मुलाच्या अकाली मृत्यू झाल्याने महाजन कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे कळमसरे गावावरही शोककळा पसरली आहे. दरम्यान ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Topics mentioned in this article