छत्रपती संभाजीनगर शहरातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सुट्टीचे आदेश काढले आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. फक्त शहरातील शाळांनाच असणार सुट्टी असणार आहे.
(नक्की वाचा - 'विधानसभेला पुरे पाडा...' जरांगे गरजले, कोणाचे टेन्शन वाढले?)
छत्रपती संभाजीनगर शहरात 13 जुलै रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने वसंतराव नाईक चौक सिडको ते क्रांती चौकपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता संवाद फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या शांतता संवाद फेरीसाठी जिल्हाभरातुन व आजुबाजूच्या जिल्हातील समाजबांधव लाखोंच्या संख्येने सहभागी होणार आहे.
(नक्की वाचा - नंबर गेम! शरद पवारांचे मोठं भाकीत, महायुतीचे टेन्शन वाढले?)
शहारात व परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी व वाहतुकीचे नियोजन सुरळीत करण्यासाठी तसेच कुठलाही अनुसुचित प्रकार घडू नये व नियोजित शांतता संवाद फेरी सुरळीत पार पडवी यासाठी मराठा क्रांती मोर्चाने 13 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर शहारातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालय व तसेच सर्व औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या बंद ठेऊन सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची विनंती प्रशासनाला केली होती. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते. तर शाळांना सुट्टी देण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी संबंधित शिक्षण विभागाला पत्र पाठवले होते.