स्वानंद पाटील, प्रतिनिधी
मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये आज शांतता रॅलीला संबोधीत केले. यावेळी प्रचंड गर्दी जमली होती. यावेळी त्यांनी लोकसभे प्रमाणे विधानसभेला आता पुरे पाडा असा संदेश मराठा समाजाला दिला आहे. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्य आहेत. लोकसभेला 'पाडा' असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले होते. त्याचा असर महाराष्ट्रात दिसला. महायुतीच्या उमेदवारांना त्याचा फटका बसला. खास करून मराठवाड्यात भाजपच्या उमेदवारांना दारूण पराभव स्विकारावा लागला. आता जरांगेंनी पुन्हा एकदा 'विधानसभेला पुरे पाडा' असे आवाहन समाजाला केले आहे. त्यांच्या या आवाहानाचा फटका कोणाला बसणारा याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मनोज जरांगेंनी अखेर केले आवाहन
मनोज जरांगे पाटील सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. ते मराठा समाजाला शांतता राखण्याचे आवाहन करत आहेत. त्यांच्या शांतता रॅलींनी संपुर्ण मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आज बीड इथे झालेल्या शांतता रॅलीत तुफान गर्दी जमली होती. यावेळी त्यांनी छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. बीड जिल्ह्यात मराठा समाजाच्या मुलांवर हल्ले झाले. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. शिरूर,गेवराई,आष्टीत आमच्या मुलांना मारले.आम्ही भित नाहीत,आम्ही क्षत्रिय मराठे आहोत. आमचीच मते घ्यायची आणि आम्हालाच दमदाटी करायची हे चालणार नाही असे जरांगे यांनी ठणकावून सांगितलं. त्यामुळे विधानसभेला पुरे पाडा. मराठ्याला त्रास देणारे बीड जिल्ह्यातील एकही निवडून येऊ देऊ नका, असे आवाहनच त्यांनी उपस्थित मराठा समाजाला केले.
ट्रेंडिंग बातमी - नंबर गेम! शरद पवारांचे मोठं भाकीत, महायुतीचे टेन्शन वाढले?
मराठा कुणबी एकच
या शांतता रॅलीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आणि कुणबी हा एकच असल्याचा उल्लेख केला. हैदराबादला त्याच्या नोंदी सापडल्या आहे. सगेसोयरे आणि सरसकट आरक्षण द्या ही आपली मागणी कायम आहे असेही ते यावेळी म्हणाले. मराठा समाजाचे दुख: ना महायुतीला दिसत आहे ना महाविकास आघाडीला. तु मारल्या सारखं कर आणि मी रडल्या सारखं करतो असं सध्या सुरू आहे असेही ते म्हणाले. आतापर्यंत आरक्षणासाठी 350 आत्महत्या झाल्या आहेत. असेही जरांगे यावेळी म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - स्मृती इराणी यांनी अखेर रिकामा केला सरकारी बंगला, नवीन घर कुठे मिळाले?
पुन्हा मुंबईत धडकणार
गेली 70 वर्षे पुढाऱ्यांना आम्हीच मोठं केलं. त्यांची मुलंबाळ आमदार मंत्री झाले. पण मराठा समाज तिकडेच आहे. त्याला आता हक्काचे आरक्षण हवे आहे. त्यांना अधिकारी व्हायचे आहे. त्यामुळे सरकारने वेळीच निर्णय घेतला पाहीजे. सरकारला मुदत दिली आहे. त्या मुदतीत त्यांनी हा निर्णय घेणे अपेक्षित आहे. जर तसे झाले नाही तर पुन्हा मुंबईच्या दिशेने यावे लागले असा इशाराच त्यांनी सरकारला दिला आहे. जाती पेक्षा आपल्याला समोर कोणी मोठा नाही. फडणवीस हे भुजबळांना हाताशी धरून काम करत आहेत. त्यामुळे भाजप संपत चालली आहे. त्यामुळे मराठा समाजाने एकसंधा राहीलं पाहीजे. मतदान मोठ्या प्रमाणात करा असे जरांगे यांनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world