कोल्हापुरात कलम 163 लागू, 'या' गोष्टी करण्यावर बंदी

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कलम 163 लागू केला आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीस सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हीडिओ,अफवा पसरवणारे संदेश, खोटी माहिती देता येणार नाही.

Advertisement
Read Time: 2 mins
कोल्हापूर:

कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरक्षित रहावी यासाठी आता स्थानिक प्रशासन पावलं उचलतच आहे. विशाळगडावर झालेल्या हिंसाचारानंतर प्रशासनाने कठोर निर्णय घेतले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कलम 163 लागू केला आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीस सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हीडिओ,अफवा पसरवणारे संदेश, खोटी माहिती देता येणार नाही. जो व्यक्ती असे कृत्य करेल त्यावर कारवाईचेही आदेश देण्यात आले आहेत. विशाळगडावरील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई झाल्यानंतर कोल्हापूरात तणावाचे वातावणर निर्माण झाले आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या इंस्टाग्राम, व्हॉटसअॅप, ट्वीटर, फेसबुक वर अफवा पसरवणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नरज असले. शिवाय  जातीय द्वेष पसरवणारे संदेश पाठविणे, खोटी माहिती पोस्ट किंवा फॉरवर्ड करणे आणि कोल्हापूर जिल्हा हद्दीमध्ये वरील विषयाच्या अनुषंगाने व समाजात तेढ निर्माण होईल असे बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग लावण्यावरही बंदी आणण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्पष्ट केले आहे.  

ट्रेंडिंग बातमी - कुंभे धबधब्यावर रिल स्टार गेली, पाय घसरून 300 फूट खोल दरीत कोसळली, पुढे काय झालं?

विशाळगडावर अनाधिकृत अतिक्रमणा विरोधात जोरदार निदर्शने झाले. त्यानंतर कारवाईही झाली. यामुळे सध्याच्या स्थितीत तणावाचे वातावरण आहे. अशा वेळी आणखी तणाव वाढून परिस्थिती चिघळू नये असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे कलम 163 जारी करण्यात आले आहे. अतिक्रमण हटवावे यासाठी विशालगडाच्या पायथ्याशी मोठा हिंसाचार झाला होता. शिवाय मोठी नासधुसही करण्यात आली होती. दगडफेक आणि जाळपोळही करण्यात आली होती. त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. 

ट्रेंडिंग बातमी - तलाक, तलाक, तलाक! 'या' देशाच्या राजकुमारीनं Instagram वरुन दिला नवऱ्याला घटस्फोट

या घटनेनंतर समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. त्या अनुषंगाने या घटनेचे काही व्हिडीओ व्हायरल करण्यात आले होते. त्याला वेळीच चाप लावण्यात आला. शिवाय आणखी हे प्रमाण वाढू नये याची वेळेवरच काळजी घेण्यात आली आहे. सर्व परिस्थितीवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. 
 

Advertisement