जाहिरात

कुंभे धबधब्यावर रिल स्टार गेली, पाय घसरून 300 फूट खोल दरीत कोसळली, पुढे काय झालं?

16 जुलैला ही बरेचशे पर्यटक कुंभे धबधब्यावर आले होते. त्यात रिल स्टार म्हणून ओळख असलेली अवनी कामदार ही आपल्या मित्र मैत्रिणींसह आली होती.

कुंभे धबधब्यावर रिल स्टार गेली, पाय घसरून 300 फूट खोल दरीत कोसळली, पुढे काय झालं?
रायगड:

रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यात वर्षा पर्यटनासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. त्यात तालुक्यातला कुंभे धबधबा हा सर्वात प्रसिद्ध आहे. इथे तर मुंबई पुण्यातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. 16 जुलैला ही बरेचशे पर्यटक कुंभे धबधब्यावर आले होते. त्यात रिल स्टार म्हणून ओळख असलेली अवनी कामदार ही आपल्या मित्र मैत्रिणींसह आली होती. सात जणांचा हा ग्रुप धबधब्यावर आला होता. त्यावेळी अवनी ही फोटो काढण्यासाठी पुढे सरसावली होती. त्यावेळी तिचा पाय घसरला आणि ती जवळपास तीनशे ते साडे तीनशे फुट खोल दरीत कोसळली. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

16 जुलैला सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर एकच आरडाओरड सुरू झाली. एकतर मुसळधार पाऊस त्यात धबधब्याचा मोठा झोत. यामुळे बचाव कसा करायचा असा प्रश्न तिथे असणाऱ्यांना पडला. त्यांनी तातडीने ही माहिती माणगाव पोलिसांना दिली. त्यानंतर माणगाव पोलीस उपविभागीय अधिकारी, माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे माणगाव तहसीलदार विकास गारूडकर तसेच साळुंके रेस्क्यू टीम, सीस्केप रेस्क्यू टीम , कोलाड रेस्क्यु टीम, महावितरण कर्मचारी, आरोग्य यंत्रणा हे घटनास्थळी दाखल उपस्थित होते.

ट्रेंडिंग बातमी - तलाक, तलाक, तलाक! 'या' देशाच्या राजकुमारीनं Instagram वरुन दिला नवऱ्याला घटस्फोट

घटनास्थळी सर्व यंत्रणा दाखल झाल्या. रेस्कू टीम कामाला लागली. त्यानंतर तब्बल 6 तासांच्या रेस्क्यूनंतर अवनीला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तिला तातडीने माणगावच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिला जबर जखमा झाल्या होत्या. डॉक्टरांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तिचा मृत्यू झाला. उपचारा दरम्यान तिला मृत घोषीत करण्यात आले. या अपघातानंतर माणगाव तहसीलदार तसेच माणगांव पोलीस निरीक्षक यांनी पर्यटन करा पर्यटनाचा आनंद घ्या पण स्वतः चा जीव धोक्यात घालू नका, जीवावर बेतेल असे वर्तन करू नका असे आवाहन तरुण पिढीसह सर्व पर्यटकांना केले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com