Navi Mumbai: नवी मुंबईत शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ अटक, रक्कम पाहून म्हणाल...

एसीबीच्या नवी मुंबई युनिटने दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सापळा रचून ही कारवाई केली.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी मुंबई:

राहुल कांबळे 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) वाशी येथील विभागीय कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) पथकाने मंगळवारी त्यांना रंगेहाथ पकडले. अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव राजेंद्र माणिक आहिरे असं आहे. ते उपसंचालक व मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून वाशी येथे कार्यरत होते. एसीबीच्या नवी मुंबई युनिटने दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सापळा रचून ही कारवाई केली, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांनी दिली. या प्रकरणात मनोहर लक्ष्मण पवार जे स्टोअर्स विभागाचे प्रभारी आहेत, यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. कंत्राटदाराकडून बिल पास करण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केली होती.  एसीबीच्या माहितीनुसार, तक्रारदार हा एक इलेक्ट्रिकल कंत्राटदार आहे. 

नक्की वाचा - Ashok Kharat: 4650 व्हिडीओ, 451 अकाऊंट डिलीट! खरातच्या SIT चौकशी समोर आले 'हे' 5 धक्कादायक राज

त्याला वाशी सेक्टर 16 ए येथील शिक्षण मंडळाच्या कार्यालयातील इलेक्ट्रिकल उपकरणांच्या देखभाल व दुरुस्तीचे एक वर्षाचे कंत्राट मिळाले होते. करारानुसार कंत्राटदाराला दरमहा जीएसटीसह 31,152 रुपये देणे होते. नोव्हेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीतील 3,16,800 रुपयांची बिले मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. मात्र, ही बिले मंजूर करण्यासाठी आहिरे यांनी पवार यांच्या माध्यमातून 22,176 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. यामुळे तक्रारदाराने 25 मार्च 2026 रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. तपासात 20 हजारांवर तडजोड झाली. 

Advertisement

नक्की वाचा - Pune News: नशेत अनेक गाड्यांना ठोकले, मग पोलीसाच्या अपहरणाचा प्रयत्न, नंतर भर रस्त्यात चोप

त्यानंतर सापळा रचण्यात आला. 6 एप्रिल रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत आहिरे यांनी पवार यांच्या संगनमताने लाचेची रक्कम कमी करून 20 हजार रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शविल्याचे निष्पन्न झाले. यानंतर 7 एप्रिल रोजी एसीबीने सापळा रचला असता, आहिरे यांना त्यांच्या कार्यालयातील केबिनमध्ये तक्रारदाराकडून 20 हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.