'काटा लगा' फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हीचा नुकताच मृत्यू झाला. तिच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. ऐवढ्या तरूण वयात तिने या जगाचा निरोप घेतला. सोशल मीडियावर तिच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तिचा एक चाहता वर्ग होता. त्यांच्याकडूनच तिच्या मृत्यू बाबत काही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पण याबाबत अजून ही काही ठोस माहिती समोर आलेली नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सध्या तरी शेफाली जरीवाला हीच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. तिचा मृत्यू कार्डियाक अरेस्टमुळे म्हणजेच हृदयविकाराचा झटका आल्याने झाले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच याला अधिकृत दुजोरा मिळेल. तिचा शवविच्छेदन अहवाल अजूनही समोर आलेला नाही. तो हाती लागल्यानंतर नक्की तिच्या मृत्यूचे कारण समजू शकणार आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तिच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी शेफालींच्या रक्ताचे आणि व्हिसेराचे नमुने घेतले आहेत. हे नमुने सध्या कलिना येथील प्रादेशिक न्यायसहायक विज्ञान प्रयोगशाळेत (FSL) तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. औषधांची प्रतिक्रिया किंवा इतर कोणत्याही कारणाचा शोध घेण्यासाठी सूक्ष्म आणि विषारी घटकांचे विश्लेषण (micro and toxicology analysis) केले जाईल. FSL अहवाल मिळाल्यानंतरच फॉरेन्सिक टीम मृत्यूचे कारण निश्चित करू शकेल.
शेफालीच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते, हा प्रश्न सध्या सर्वांच्या मनात आहे. FSL अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. म्हणजेच, हा अहवाल येईपर्यंत आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल. शेफालीच्या इमारतीमधील सुरक्षा रक्षकाने NDTV ला दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 10 ते 10:30 च्या दरम्यान शेफालीला रुग्णालयात नेण्यात आले होते. रात्री 1 वाजता इमारतीमध्ये त्यांच्या निधनाची बातमी आली. दोन दिवसांपूर्वी शेफाली आपल्या पती बरोबर इमारतीच्या आवारात दिसली होती. त्यावेळी त्यांचा कुत्राही त्यांच्या सोबत होता.
दरम्यान शेफालीच्या मृत्यूनंतर रात्री उशिरा पोलीस पथक तिच्या इमारतीत पोहोचले होते. पोलीस व फॉरेन्सिक टीमने काही नमुने आपल्या सोबत नेले आहेत. या घटनेवर पोलिस आणि फॉरेन्सिक तपास अजूनही सुरू आहे. शेफालीच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येण्यासाठी काही वेळ लागू शकतो. मात्र शेफालीचा मृत्यू सर्वांनाच चटका लावून जाणारी आहे. काटा लगा या अल्बमनंतर ती चर्चेत आली होती. तिचा तो अल्बम खूप गाजला होता.