Shirdi : मोलमजुरी करुन बाबांसाठी पैसे जमवले, हिंगोलीच्या वृद्धाकडून साईबाबांना 3 लाखांचं दान 

हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील वयोवृद्ध नरसिंगराव बंडी यांनी साईचरणी तब्बल तीन लाखांचा धनादेश दिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नाशिक:

दरवर्षी साईबाबांच्या चरणी मोठं दान दिलं जातं. साईबाबांच्या दरबारी सामान्य भाविकांपासून ते अब्जाधीश भाविक आपल्या इच्छाशक्तीनुसार दान करत असतात. अगदी साईबाबांना दागिने, पैसे, अलंकार यांसारख्या गोष्टी दान केल्या जातात. काही महिन्यांपूर्वी साईबाबांना 42 लाख 80 हजारांचा सुवर्णमुकुट दान करण्यात आला होता. 2022 मध्ये तर साईबाबांच्या चरणी 400 कोटींचं दान अर्पण करण्यात आलं होतं. 

नक्की वाचा - Sushila Meena: जहीरसारखी अ‍ॅक्शन, सचिनकडून कौतुक; पण त्या मजुराच्या लेकीचं भवितव्य काय?

यंदाच्या वर्षीही साईबाबांच्या चरणी मोठं दान करण्यात आलं. आज 25 डिसेंबरला नाताळाच्या निमित्ताने मोल-मजुरी करणाऱ्या अत्यंत सामान्य व्यक्तीने  आपल्या जीवनातील जमापुंजी साईचरणी अर्पण केल्याचं समोर आलं आहे. सुतारकाम करणारे वयोवृद्ध नरसिंगराव बंडी एकटे राहतात. ते साधारण 80 वर्षांचे आहेत. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील वयोवृद्ध नरसिंगराव बंडी यांनी साईचरणी तब्बल तीन लाखांचा धनादेश देत दान केलय. साईमंदिरात एकेकाळी 1 रुपयाला जेवण मिळत होतं. त्यांच्या आडोशाला राहिलो आहे. आता त्यांना माझ्याकडून काहीतरी द्यावं म्हणून माझी जमापुंजी त्यांच्या चरणी ठेवत असल्याचं बंडींनी सांगितलं.

Advertisement

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

किती दान दिलंय? काय दिलंय? याचा गाजावाजा न करता अत्यंत भक्तीभावाने त्यांनी आपल्याकडील रक्कम बाबांच्या चरणी अर्पण केली आहे. जीवनात काही अनुभव आल्यानं हे दान करत असल्याच ते सांगताय. तर ही श्रद्धा असून ती बाबांना अर्पण केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. साई संस्थानच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला असून इतर देणगीदारा प्रमाणे त्यांना साई मंदिरात दर्शन देण्यात आलं. 

Advertisement