शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. शिवाय एकनाथ शिंदे यांचे नावन घेता त्यांनाही लक्ष केलं. हिंदूत्वाच्या प्रश्नावरून उद्धव यांनी भाजपला चांगलेच फैलावर घेतले. मोहन भागवत एकीकडे मुस्लीमांच्या गाठीभेटी घेत आहेत तर दुसरीकडे भाजप बटेंगे तो कटेंगे करत आहे. मग तुमचा खरा चेहरा कोणता? ते आधी सांगा मग हिंदूत्वावर बोला असा इशाराही ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिला. भाजप हा अमिबा आहे. तो कसाही पसरत आहे. शरीरात गेला तर पोट बिघडतं. समाजात गेला तर समाजाची शांती भंग होते. म्हणून भाजप हा अमिबा आहे असा हल्लाबोल ही ठाकरे यांनी यावेळी केला.
उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या झेंड्याचा प्रश्नही इथं उपस्थित केला. तुमच्या फडक्यावरील हिरवा रंग काढा मग आमच्या अंगावर या. संघाने ज्या कामासाठी 100 मेहनत घेतली त्या मेहनतीला लागलेली ही विषारी फळे पाहून तुम्हाला समाधान वाटतंय का? प्रश्न त्यांनी यावेळी मोहन भागवत यांना केला. संघाचा हेतू ब्रम्हदेवाचा बाप होण्याचा असेल मात्र ब्रम्हदेव नाही झाला तर ब्रम्हराक्षस झाला आहे अशा टीकाही त्यांनी केली. भाजपची अवलाद पगारी मतदार तयार करते आहे. पगारी मतदार व्हायचे की स्वाभिमानी मतदार हे तुम्ही ठरवायचे आहे. असं ही ते म्हणाले.
मराठवाड्यात पुरस्थिती आहे. तिथल्या शेतकऱ्याला मदतीची गरज आहे. सत्ताधाऱ्यांनी दिल्लीत जाऊन बसायला हवे होते. मत विकत घ्यायला तुमच्याकडे पैसे आहेत. मात्र उद्ध्वस्त झालेल्या महाराष्ट्राला द्यायला तुमच्याकडे पैसे नाही हा माझा जाहीर आरोप आहे. बिहारमध्ये महीलांना दहा हजार दिले. त्यासाठी काही निकष लावले गेले नाहीत. पण महाराष्ट्राला मदत करताना निकष कसे लावताय. फडणवीस अजून अभ्यास करत आहेत. शेतकऱ्याला मगत ही मिळालीच पाहीजे. जर ती मिळाली नाही तर शिवसेना मराठवाड्यात रस्त्यावर उतरल्या शिवाय राहाणार नाही असा इशाराही ठाकरे यांनी यावेळी दिला. कर्जमाफी करा. त्यांना एकरी मदत जाहीर करा. असे ही ठाकरे यावेळी म्हणाले.
यावेळी ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की वाघाचं कातडं पांघरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहित आहे. पण बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं चित्र पहिल्यांदा पाहिलं. गाढवावर किती शाली टाका गाढव ते गाढवच. अमित शाहाचं जोडे उचलणारं हे गाढव आहे. निवडणुकीत आता जनता जोडे मारल्या शिवाय राहणार नाही असं ही ठाकरे यावेळी म्हणाले. शिवसेना फोडण्याचे कारस्थान अजून ही सुरू आहे. पण जे फुटले ते पितळ होतं. खरं सोन शिवाजी पार्कमध्ये आलेले शिवसैनिक आहेत. तिच खरी आपली ताकद आहे असं ही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. मुंबई महापालिकेची वाट लावली आहे. निवडणूक झाल्यानंतर आपण व्हाईट पेपर काढू असं ही त्यांनी जाहीर केलं.
नक्की वाचा - Manoj Jarange: नव्या मागण्या नवा इशारा! मनोज जरांगेंनी फडणवीसांचे टेन्शन वाढवले
यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या बरोबरच्या युतीबाबतही भाष्य केलं. अनेक जण विचारत होते राज यांना दसरा मेळाव्याला बोलावणार की नाही. आम्ही दोघे एकत्र आलोय एकत्र येण्यासाठी असं उद्धव यांनी स्पष्ट केलं. हे वक्तव्य करत त्यांनी युतीवर एक प्रकारे शिक्कामोहर्तब केला आहे. आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असं उद्धव म्हमाले. इथं मातृभाषेचा घात होत असेल तर मी मराठी माणसात फूट पडू देणार नाही. मराठीवर हिंदीची सक्ती होवू देणार नाही. हिंदीला आमचा विरोध नाही. पण ती आमच्यावर थोपवू नका असं ही ते म्हणाले.