अमजद खान, प्रतिनिधी
Dombivli News : कल्याण डोंबिवलीतील 65 इमारतींना अनधिकृत घोषित केल्यानंतर साडे सहा हजार कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे .आम्ही कुणालाही बेघर होऊ देणार नाही अशी भूमिका घेत शिवसेना ठाकरे गटाने इमारतीतील राहिवाशांना पाठिंबा दिला आहे. या नागरिकांना सर्व प्रकारे मदत केली जाईल, अशी घोषणा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांनी केला आहे.
दिपेश म्हात्रे यांनी अशी घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर समर्थन मिळत आहे आता तर थेट शिवसेनेचे माजी नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी ठाकरे गटाच्या या मुद्द्याला समर्थन देत सर्वांनी या मुद्द्याला समर्थन करावे अशी पोस्ट केली आहे .त्यामुळे निदान या मुद्द्यावर तरी ठाकरे गट शिंदे गट एकत्र आल्याचे दिसत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
महारेरा घोटाळ्यात कल्याण डोंबिवलीतील 65 इमारती अनधिकृत घोषित करण्यात आल्या आहेत .या इमारतीवर तोडक कारवाई करण्यात येणार असल्याने रहिवासी संकटात सापडलेत. घरे तुटणार असल्याने आता काय करायचे याबाबत त्यांच्यासमोर सवाल उभा ठाकलाय . खोटी कागदपत्र देऊन आपली फसवणूक करणाऱ्या विकासकावर, पालिका अधिकाऱ्याना रान मोकळे मात्र आमच्यावर अन्याय का असा प्रश्न या इमारती मधील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाने रहिवाशांच्या बाजूने भूमिका घेतली असून कारवाई होऊ देनार नाही , रस्त्यावरची लढाई न्यायालयीन लढाई लढू असा इशारा देखील दिला. ठाकरे गटाच्या या भूमिकेला शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांचा देखील पाठिंबा दिला आहे.
शिंदे गटाचे दीपक भोसले यांनी सोशल मीडियावर याप्रकरणी नगररचना विभागातले सुरेंद्र टेंगळे हे कारणीभूत असल्याचे पोस्ट केले त्या पोस्टला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे माजी नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी ठाकरे गटाच्या या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे असा आवाहन केलं आहे. राज्यभरात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटात मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहेत दोन्ही गट एकमेकांसमोर उभे टाकले तर कल्याण डोंबिवलीत मात्र या मुद्द्यावरून दोघं एकत्र आले आहेत.