Shocking Video: बापरे! पाणीपुरीच्या ठेल्यावर निघाला साप, ग्राहकांची उडाली तारांबळ

Snake Spotted at Panipuri Stall : पाणीपुरीचा आनंद लुटणाऱ्या ग्राहकांच्या समोर अचानक साप आल्याने परिसरात एकच पळापळ आणि घबराट निर्माण झाली. सुदैवाने, या सापाने कोणालाही इजा केली नाही. 

जाहिरात
Read Time: 1 min

Snake at Panipuri Stall: 

खवय्यांची आवडती असलेल्या पाणीपुरीच्या गाडीवर आज चक्क एका सापाने दर्शन दिले. विरार शहरातील एका गजबजलेल्या रस्त्यावरील पाणीपुरीच्या ठेल्यावर साप आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अचानक ठेल्यावरील साहित्याच्या आडून एक साप बाहेर आल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. पाणीपुरीचा आनंद लुटणाऱ्या ग्राहकांच्या समोर अचानक साप आल्याने परिसरात एकच पळापळ आणि घबराट निर्माण झाली. सुदैवाने, या सापाने कोणालाही इजा केली नाही. 

उपस्थित असलेल्या काही तरुणांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये टिपला, जो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.  सुदैवाने सर्पमित्रांनी किंवा स्थानिक नागरिकांच्या मदतीने सापाला सुरक्षितरीत्या बाजूला करण्यात आले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.

(नक्की वाचा-  Mumbai News: मुंबईत गाडी चालवण्यासाठी भरावा लागणार 'कंजेश्चन टॅक्स'? भाजप नेत्याचा BMC ला प्रस्ताव)

अन्नसुरक्षेचा गंभीर प्रश्न

मात्र या प्रकारामुळे रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. उघड्यावर ठेवलेले साहित्य, स्वच्छतेचा अभाव, पाण्याची गुणवत्ता आणि अन्न हाताळण्याच्या पद्धतीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त होत आहे. “रस्त्यावरील पाणीपुरी खाणे खरंच सुरक्षित आहे का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Advertisement

पाहा VIDEO

Topics mentioned in this article