Shocking Video: दादरमध्ये इडली बनवण्यासाठी शौचालयाचे पाणी? Video व्हायरल होताच मुंबईकरांमध्ये संतापाचा उद्रेक

याची चौकशी करण्याची गरज आता व्यक्त होत आहे. तस होत नसेल तर नागरिकांच्या आरोग्याशी हा खेळ असेल.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • मुंबईतील दादर पूर्व रेल्वे स्थानकाजवळील एका इडली विक्रेत्यावर शौचालयातील पाण्याचा वापर केल्याचा आरोप
  • सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विक्रेता शौचालयाचे पाणी इडली तयार करण्यासाठी वापरत आहे
  • या घटनेमुळे स्थानक परिसरातील खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेवर आणि आरोग्यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

सकाळचा नाश्ता म्हटला तर मुंबईकर स्टेशन बाहेर खाताना सर्रास दिसतात. पण ही बातमी पाहील्यानंतर तुम्ही कदाचीत आपलं मन बदलाल.  मुंबईतील गजबजलेल्या दादर पूर्व रेल्वे स्थानक परिसरातून एक खळबळजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका इडली विक्रेत्याने खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी थेट रेल्वे शौचालयाच्या पाण्याचा वापर केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यामुळे मुंबईकर प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

दादर हे मुंबईतील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन आहे. इथं दररोज हजारो प्रवासी या परिसरातून ये-जा करतात. यातील बहुतांश चाकरमानी आणि प्रवासी सकाळी किंवा संध्याकाळी स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांकडे नाश्ता आणि इतर खाद्यपदार्थ खातात. मात्र, या ताज्या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरातील खाद्यपदार्थांच्या दर्जावर आणि स्वच्छतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा प्रकारांमुळे अन्न सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Advertisement

नक्की वाचा - Petrol Diesel Price : पेट्रोल-डीजलचे नवीन दर जाहीर! टाकी फुल करण्याआधी जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे भाव?

हा व्हिडिओ एका तरुणाने बनवला आहे. त्यात तो एका इसमाचा पाठलाग करत आहे. त्याच्या हातात एक रिकामा कॅन आहे. त्यानंतर तो इसम एका शौचालया जवळ जातो. शौचालयातील पाण्याने भरलेला ड्रम तो इसम आपल्या हातात घेतो. नंतर तो आपल्या इडलीच्या दुकानात जातो. त्या शौचालयाच्याच पाण्याचा तो इडलीसाठी वापर करतो. या व्हिडिओत हे स्पष्टपणे दिसत आहे. या ठिकाणी नेहमीच गर्दी असते. अशा स्थितीत लोकांच्या आरोग्याशी खेळल्या सारखाच हा प्रकार आहे. 

नक्की वाचा - Viral Video: हुबेहूब सुशांत सिंह राजपूत! निसर्गाचा चमत्कार पाहून चाहत्यांच्या डोळ्यात पाणी, पाहा Video

व्हायरल झालेल्या या व्हिडिओची सत्यता अद्याप अधिकृतरीत्या पडताळण्यात आलेली नाही. मात्र, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर रेल्वे प्रशासन, मुंबई महानगरपालिका (BMC) आणि अन्न व औषध प्रशासनाने (FDA) या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. स्थानक परिसरातील फेरीवाल्यांच्या स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन होते की नाही, याची चौकशी करण्याची गरज आता व्यक्त होत आहे. तस होत नसेल तर नागरिकांच्या आरोग्याशी हा खेळ असेल.