- दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा अभिनय प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारा ठरला होता
- 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतच्या अचानक मृत्यूने संपूर्ण देशाला मोठा धक्का दिला होता
- सोशल मीडियावर सुशांतसारखा दिसणाऱ्या अयान नावाच्या तरुणाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे
बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले होते. 14 जून 2020 रोजी झालेल्या त्याच्या अचानक मृत्यूने संपूर्ण देशाला धक्का दिला होता. आजही त्याचे चाहते त्याला विसरू शकलेले नाहीत. दरम्यान, सोशल मीडियावर सुशांत सिंह राजपूतसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्याला पाहून त्याचे चाहते भावूक झाले आहेत. शिवाय हा निसर्गाचा चमत्कार असल्याचं ही काहींनी म्हटलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या तरुणाचे नाव अयान असे आहे. अयानचे केस, त्याची हसण्याची पद्धत आणि डोळे अगदी सुशांतसारखेच दिसतात. इन्स्टाग्रामवर त्याचे 295K फॉलोअर्स आहेत. जे त्याच्या प्रत्येक पोस्टला मोठ्या प्रमाणावर लाईक आणि शेअर करतात. अयानचे व्हिडिओ पाहून अनेक जण त्याला सुशांतची झेरॉक्स कॉपी म्हणत आहेत. तुम्ही ही जर का त्याचा व्हिडीओ पाहीला तर क्षणभर तुम्हाला ही तुमच्या डोळ्यांवर विश्वास पटणार नाही. पण हे सत्य आहे.
अयानचे व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युझरने लिहिले की, "या तरुणाला सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबाला नक्की भेटवायला हवे." तर दुसऱ्या एका युझरने "वेलकम बॅक सुशांत सर" अशी कमेंट केली आहे. बहुतांश नेटकऱ्यांनी याला 'कुदरत का करिश्मा' म्हणजेच निसर्गाचा चमत्कार म्हटले आहे. सुशांतने 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर 'काय पो छे', 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', 'छिछोरे' यांसारख्या चित्रपटांतून बॉलिवूडमध्ये आपली खास ओळख निर्माण केली होती.
छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात करून बॉलिवूडमध्ये स्वतःचे साम्राज्य निर्माण करणारा अभिनेता म्हणजे सुशांत सिंह राजपूत. 21 जानेवारी 1986 रोजी जन्मलेल्या सुशांतने 'पवित्र रिश्ता' मधील मानवच्या भूमिकेने प्रत्येक घरात स्थान मिळवले. मात्र, 14 जून 2020 रोजी त्याच्या अचानक जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला. आज सुशांत आपल्यात नसला तरी सोशल मीडियावर त्याचा एक हमशक्ल समोर आला आहे, ज्याला पाहून चाहत्यांना जुन्या दिवसांची आठवण झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world