Pune Yerwada Jail Latest News : भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पुणे येथील येरवडा खुले कारागृहात कैद्यांसाठी एका अनोख्या,उत्साही आणि भावनिक सांगीतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.ऑर्केस्ट्रा राहिल म्युझिकल मेलोडीज आणि स्व.मोहम्मद रफी फॅन्स क्लब,पुणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 10.00 ते दुपारी 1.30 या वेळेत पद्धतीचा देशभक्तीपर गाण्यांचा बहारदार कार्यक्रम पार पडला हा संपूर्ण सोहळा महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक डॉ.सुहास वारके,विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई तसेच पुणे विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक सुनील ढमाळ यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब पुणेचे सदस्य संतोष दांगट,अनिल ताठे आणि अशोक शेडगे हे उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित सर्व पाहुण्यांचे आणि कलाकार मंडळींचे कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन अत्यंत सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांनी स्वतः देशभक्तीवर आधारित सुंदर शेरोशायरी सादर केली.त्यांच्या प्रत्येक शेरावर उपस्थित कैदी आणि कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात मोठी दाद दिली.
देशभक्तीपर गाण्यांनी संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध
देशभक्तीपर गाण्यांनी संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला. या सांगीतिक मैफलीत "ए मेरे वतन के लोगो","मेरे देश की धरती","नन्हा मुन्ना राही हूं","मेरा रंग दे बसंती चोला","मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू","मेरे देशप्रेमियों" आणि "मेरा देश मेरा मुल्क" यांसारखी एकापेक्षा एक लोकप्रिय आणि मन हेलावून टाकणारी गाणी सादर करण्यात आली.या सोहळ्यात "चोरीचा मामला,मामाही थांबला","अरे दिवानो मुझे पहचानो" आणि "यमला पगला दिवाना" या गाण्यांनी विशेष रंगत आणली.संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन आणि गायन मुराद काजी यांनी केले.
नक्की वाचा >> स्वातंत्र्यदिनी धारावीतील विद्यार्थ्यांनी रंगवलं धारावीचं भविष्यचित्र! ‘मेरे सपनो की धारावी' उपक्रम चर्चेत
या मंचावर मुराद अजीज काजी,कविता तरडे-फुगे,हर्षराज भाऊराव तायडे,किशोर चंद्रकांत गायकवाड,देवदत्त प्रभाकर राजगुरू, रानी कुमारी पंकज सिंह,उर्मिला अशोक कावडे,ख्वाजा रहीम शेख,ACP सुनिल यादव आणि कैद्यांनी आपली गायन कला सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते शिपायांपर्यंत सर्वांनीच सांघिक मेहनतीचे उत्तम उदाहरण सादर केले.यामध्ये वरिष्ठ तुरुंग अधिकारी नागेश कांबळे,तुरुंग अधिकारी नागनाथ भानवसे,निशा श्रेयकर आणि सुभेदार सुनील गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
तसेच सुभेदार चंद्रकांत खांदवे,बालाजी सावंत,दत्तात्रय चव्हाण,हवालदार राजेंद्र धनगर,प्रकाश भोसले,वैशाली थोरात,कारागृह महिला शिपाई सरला साबळे,शैला कदम,सुरेखा म्हात्रे,संध्या जाधवर,मोनिका लांडगे,सुरेखा म्हेत्रे आणि मीना पोटकुले यांनी व्यवस्थापनात मोलाचे योगदान दिले.यासोबतच कारागृह शिपाई याकुब शेख,वैभव पाटील,मोहसिन जमादार,विजयकुमार दिवेकर,निलेश मांढरे, महेश हळदकर आणि महेंद्र लोहकरे या सर्वांच्या परिश्रमामुळे हा सोहळा शिस्तीत संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी कारागृहातील सर्व शिक्षाबंदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.