Lohagad Case: सिया-चेतनला कोर्टात हजर केल्यानंतर काय घडलं? कुणाच्या वकिलांनी काय केला युक्तीवाद? वाचा सविस्तर

दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने दोघांनाही पाच दिवसांची म्हणजे तीन जुलै पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

जाहिरात
Read Time: 4 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • केतनच्या हत्येचा कट रचल्याचा संशय असून तपासात सिया आणि चेतन यांच्यासह इतर सहभागी शोधले जात आहेत
  • पोलिसांनी सिया आणि चेतनच्या सात दिवसांची कोठडी मागणी केली
  • आरोपींच्या वकिलांनी पोलिस कोठडीसाठी विरोध केला होता
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पुणे:

सूरज कसबे 

सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची आज पोलीस कोठडी संपली होती. त्यामुळे त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी दोन्ही आरोपींचे वकील पुर्ण तयारीने कोर्टात आले होते. त्यांनी सिया आणि चेतनला कोणत्या ही स्थितीत पुन्हा पोलिस कोठडी मिळणार नाही याची पूर्ण तयारी केली होती. सरकारी पक्ष आणि पोलीस ही होमवर्क करून आले होते. त्यामुळे कोर्टात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कोर्ट परिसरात त्यामुळे मोठी गर्दी ही झाली होती. केतन अग्रवालचे कुटुंबीय ही या सुनावणीला हजर होते. सुनावणी दरम्यान सियाने काही तरी बोलण्याचा प्रयत्न केला त्यासाठी तिला परवानगी ही देण्यात आली. त्यावेळी तिने आपले वकील कोण हे सांगितलं.

सुरूवातीला तपास अधिकाऱ्यांनी आपली भूमीका मांडली. ते म्हणाले केतन अग्रवालच्या हत्येचा कट रचला असल्याचं निष्पन्न झालं आहे. या कटात आणखी कोणी सहभागी होतं का हे तपासायचं आहे.  कट कुठं बसून केला हे तपासायचे आहे. सिया प्रमाणे चेतनला घेऊन रिक्रियेशन करायचं आहे असं तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितलं. लोहगडावर अनेकांशी संवाद साधला आहे. बालीला प्री वेडिंग शूटला जायचं नव्हतं म्हणून, पासपोर्ट फाडले, ते केतनचे पासपोर्ट शोधायचे आहेत. शिवाय लोहगडावर जाऊन रेकी केली का? हे तपासायचे आहे. या कटात अजून कोणी सहभागी आहे का? केतनचा मोबाईल काही वेळाने देण्यात आला, त्यातील माहिती रिकव्हर करायची आहे. त्यांनी माहिती लपवली आहे, ती मिळवायची आहे. चेतनचे कपडे हस्तगत करायचे आहेत. त्यामुळे सात दिवसांची पोलिस कोठडी मिळावी अशी मागणी करण्यात आली. 

Advertisement

नक्की वाचा - Siya Goyal: सोनम सुटली! सिया गोयल ही जामीनावर सुटणार? कोर्टाच्या 'त्या' निकालाने खळबळ

सरकारी वकीलांनीही पोलीस कोठडीसाठी जोरदार युक्तीवाद केला. सियासोबत रिक्रियेशन झालेलं आहे. पण चेतन सोबत झालं नाही. आता दोघांना घेऊन रिक्रियेशन करायचं आहे. शिवाय या कटात अजून कोणी तिसरा सहभागी आहे का?  कट कुठं रचला? रेकी कधी केली? हत्या कशी करायची याचा प्रात्यक्षिक केलं, ते कुठं ? चेतनचे कपडे घटनास्थळी जे घातले होते ते जप्त करायची आहेत असं त्यांनी कोर्टाला सांगितलं. त्यामुळे सात दिवसांची पोलीस कोठडी गरजेची आहे असं सरकारी वकीलांनी सांगितलं. यावर आरोपींच्या वकीलांना जोरदार विरोध केला. तांत्रिक तपास, चौकशी, नाट्य रूपांतर झालं. आता पुढचा तपास तांत्रिक आहे, मग पीसीची गरज वाटत नाही असं त्यांनी कोर्टाला सांगितलं. 

नक्की वाचा - Siya Goyal: सियाच्या जन्माची कहाणी! जन्म पण असा की गोयल दाम्पत्याला करावा लागला होता मोठा त्याग

सियाचे वकील विपुल दुष्यंम यांनी ही जोरदार युक्तीवाद करत पोलिस कोठडी देण्याला विरोध केला. ते म्हणाले पंकज बन्सल यांचे जजमेंट आहे. भारतात नॉन बेलेबल ऑफेन्समध्ये अटक व्हायला नको. तुमचं नाव आहे आणि तुम्ही घेऊन गेलात हे कसं? ग्राउंड ऑफ अरेस्ट आणि रिझन्स ऑफ अरेस्ट यात फरक आहे. सियाच्या अटकेच्या कारणांमध्ये 1 ते 5 लिहिलेलं आहे. ग्राउंड ऑफ अरेस्ट पर्सनाईज डॉक्युमेंट आहे. चेतनच्या अटकेतील 1 ते 3 कारणं अगदी तशीच आहेत. ही अटक कशी चुकीची आहे, हे त्यांनी कोर्टाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. पुढे त्यांनी कोर्टाा सांगितलं की आता रिमांड वाढवण्यासाठी जे कारण दिलंय, तेच आधी देण्यात आलं होतं. शिवाय सध्या मीडिया ट्रायल सुरु आहे. ही मीडिया ट्रायल थांबवायला सांगणं गरजेचं आहे. कोर्टाच्या आधी माहिती मिडियाकडे कशी काय जाते? या गोष्टींकडे ही त्यांनी लक्ष वेधलं.  

नक्की वाचा - Siya Goyal Viral Video: सियाचा आणखी एक व्हिडीओ समोर, या Video मध्ये तर कहर केला, आई- वडीलांचा दावा...

तर चेतन चौधरीचे वकील राम शहाणे यांनी ही युक्तीवाद करत पोलिस कोठडी देण्याला विरोध केला. ते म्हणाले एफआयआरमध्ये फक्त दोन वेळा चेतनचे नाव आहे. ती सारखं चेतनचे नाव घेते. शेवटी चेतन सोबत सियाने कट रचला ऐवढाच उल्लेख आहे. पंचनामा, जप्ती, समोर बसून चौकशी करणे यासाठी 7 दिवस पोलीस कोठडी आधीचं दिली आहे. लोहगडावर आधी सियाचं नाट्यरूपांतर केलं. चेतनचे नाट्य रूपांतर करायचं आहे. पॅन्ट जप्त करायची आहे? हुडी, मोबाईल, गाडी जप्त केली, तेंव्हा पॅन्ट जप्त का केली नाही? मोबाईल फोन सियाकडे होता, मग यासाठी चेतनच्या कस्टडीचा काय संबंध? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. आम्ही गाडी स्वतः आणून दिली, पॅन्ट मागितली असती तर ती पण आणून दिली असती. दरीत पडून केतनचा मृत्यू झालाय. पण इथं हत्या झाली म्हटलं जातंय. आई-वडील म्हणतायेत म्हणून याला हत्या म्हणता येणार नाही असं ही त्यांनी सांगितलं. यावेळी सियाने  कोर्टात सांगितले विपुल दूशिंगच माझे वकील  आहेत आशुतोष श्रीवास्तव नाही. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने दोघांनाही पाच दिवसांची म्हणजे तीन जुलै पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. 

Advertisement