सिया गोयल ही सध्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलीस कोठडीत आहेत. सियाने ज्या पद्धतीने केतनचा खून केला होता त्याच पद्धतीने सोनम रघूवंशी हीने ही तिचा नवरा राजा रघुवंशी यालाही खोल दरीत ढकलून त्याचा खून केला होता. जे सोनमने केलं अगदी तशीच कृीत सिया गोयलने केली होती. त्यामुळे या दोन्ही केस एक सारख्या आहेत. असं असताना कोर्टाचा एक धक्कादायक निकाल समोर आला आहे. सिया गोयल सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच वेळी सोनम रघूवंशीला मात्र कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. शिवाय तो रद्द करण्यासही उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे सियाच्याबाबतीत काय होणार याची चर्चा सुरू झाली आहे.
मेघालयमधील बहुचर्चित आणि हायप्रोफाईल 'हनीमून मर्डर केस'मध्ये मुख्य आरोपी असलेल्या सोनम रघुवंशीला मेघालय उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सोनमचा जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकारने याचिका दाखल केली होती. त्यात सोनमचा जामीन रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र ही याचिका हायकोर्टाने फेटाळून लावत सरकारला दणका दिला आहे. तर या निर्णयामुळे सोनम मोकळा श्वास घेण्यास मोकळी झाली आहे. कनिष्ठ न्यायालयाने मंजूर केलेला सोनमचा जामीन आता कायम राहणार आहे. राजाच्या खूनात ती प्रमुख आरोपी असताना ही ती आता बाहेर आहे. सोनमवर तिचा प्रियकर राज आणि इतर साथीदारांच्या मदतीने पती राजा रघुवंशीची हत्या केल्याचा आरोप आहे.
यापूर्वी मेघालयच्या पोलीस महासंचालक (DGP) इदाशिशा नोंगरांग यांनी सोनम रघुवंशीच्या जामिनाला हायकोर्टात आव्हान देणार असल्याचं सांगितलं होतं. शिवाय पोलिसांकडे या प्रकरणात भक्कम पुरावे असल्याचा दावा ही त्यांनी केला होता. मात्र, हायकोर्टाने राज्य सरकारची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे तपास यंत्रणांना हा मोठा धक्का आहे. राजा रघुवंशी आणि सोनम 21 मे 2025 रोजी हनिमूनसाठी शिलाँग इथं आले होते. त्यानंतर 26 मे रोजी ते सोहरा येथे फिरण्यासाठी गेले. त्यानंतर राजा आणि सोनम अचानक बेपत्ता झाले. पोलीस, NDRF आणि SDRF च्या पथकांनी शोधमोहीम राबवली. 2 जून 2026 रोजी राजाचा मृतदेह वेई सादोंग फॉल्सजवळील एका खोल दरीत आढळून आला होता. या प्रकरणात सोनम, तिचा प्रियकर राज कुशवाहा आणि इतर 3 कंत्राटी मारेकऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या केसचा थेट आता केतन अग्रवाल केसशी संबंध जोडला जात आहे. या केसमध्ये ही होणाऱ्या नवऱ्यास सिया गोयल या तरुणीने खोल दरीत ढकलून मारून टाकल्याचा आरोप आहे. तसा तिच्यावर आरोप आहे. या प्रकरणी तिचा प्रियकर चेतन चौधरी याला ही अटक करण्यात आली आहे. ज्या पद्धतीने सोनम रघूवंशीला कोर्टाने जामीन मंजूर केला त्याच धर्तीवर सियाला ही जामीन मिळणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. सोनमने ज्या पद्धतीने खून केला तसाच खून केतनचा ही झाला आहे. शिवाय परिस्थितीजन्य पुरावे, सीसीटीव्ही कॅमेरे, सीडीआर या गोष्टी दोन्ही केसमध्ये समान आहेत. त्यामुळे सिया ही लवकर बाहेर येणार का? अशी चर्चा रंगली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world