- गोयल दाम्पत्याला अनेक वर्ष मुल होत नव्हते. त्यांना मुलासाठी नवस केला होता.
- सिया गोयल ही कुटुंबातील पहिला मुलगी होती. तिला अत्यंत लाडाने मोठं करण्यात आलं होतं
- कुटुंबात पारंपरिक आणि धार्मिक संस्कार होते, मात्र सियाचा जीवनशैलीत या गोष्टी नव्हत्या.
सिया गोयलबाबत एक एक गोष्टी आता समोर येत आहेत. तिचे नातेवाईक ही आता तिच्या बद्दल बोलू लागले आहेत. केतन अग्रवाल या होवू घातलेल्या पतीच्या हत्येचा आरोप सियावर होत आहे. त्यानंतर तिच्याबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. मग ते तिचे पार्टी लाईफ असो की तिची दारू पिण्याची सवय असो. त्याचे व्हिडीओ ही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता आणखी एक गोष्टी समोर आली आहे. ही गोष्टी तिच्या जन्माबाबत आहे. तिचा जन्मही चमत्कारा पेक्षा कमी नाही असं तिचे कुटुंबीय सांगत आहेत. त्यामुळेच ती गोयल कुटुंबाची लाडकी होती. पण हेच लाड या कुटुंबावर आता भारी पडत आहेत.
सियाच्या आई वडीलांचे लग्न झाले होते. मात्र लग्नाच्या अनेक वर्षानंतर ही त्यांना मुलबाळ होत नव्हते. एक वेळ अशी आली की या दोघांनी ही आपल्याला आता मुल होणार नाही असं गृहीत धरलं होतं. त्यामुळेच त्यांनी आपल्या भावाच्या मुलाला दत्तक घेतलं. त्यानंतर ही त्याचे देवधर्म सुरू होते. हे कुटुंब धार्मिक स्वरुपाचे होते. पाठ पुजा, देवधर्म हे नित्याचेच होते. त्यांनी अनेक ठिकाणी मुल व्हावं यासाठी नवस केले होते. देणग्या दिल्या होत्या. पुजाअर्चा केल्या होत्या. व्रतवैकल्य केली होती. अनेक वेळा ते धार्मिक कार्यक्रमाचे ही आयोज करायचे असं त्यांच्या कुटुंबातील अत्यंत जवळच्या व्यक्तीने सांगितलं.
त्यांच्या या श्रद्धेला अखेर फळ मिळालं असंही त्यांचे नातवाईक सांगत आहे. अनेक वर्षानंतर सियाचा जन्म झाला. गोयल दाम्पत्याने केलेला नवस त्यांना पावला असं ते मानतात. त्यांनी मुल व्हावं यासाठी अनेक गोष्टींचा त्याग केला होता. त्यानंतरच सियाचा जन्म झाला असं ही त्यांनी सांगितलं आहे. ही माहिती त्यांनी एक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितली आहे. सियाचा जन्म झाला. घरात पहीली मुलगी झाली होती. शिवाय अनेक वर्षानंतर गोयल कुटुंबात पाळणा हलला होता. त्यामुळे सहाजिकच सिया ही लाडकी होती. तिचा प्रत्येक लाड पूर्ण केला जात होता. तिला हवं नको ते लहान पणापासूनच मिळत होतं.
अत्यंत धार्मिक आणि संस्कारी वातावरण गोयल कुटुंबात होतं. पण सियाचं थोडं वेगळं होतं. ती या दोन्ही गोष्टीपासून दुर होती. तिने पार्टी लाईफकडे जास्त लक्ष दिले. शिक्षण ही जेमतेम घेतलं. पण मित्र मैत्रिणीअसे पकडले की तिचं लाईफच बदलून गेलं. घरी एक वातावरण तर घरा बाहेर दुसरं लाईफ ती जगत होती. तिच्या या सवयींची माहिती तिच्या कुटुंबातील काही जणांना माहित होती. त्यामुळे ते आपल्या मुलांना तिच्यापासून दुर ठेवत होते अशी माहिती ही समोर आली आहे. लाडक्या लेकीचे लाड करता करता ति कोणत्या मार्गावर चालली आहे याकडे मात्र दुर्लक्ष झालं. त्यात अचानक तिने हत्या केल्याचं समोर आल्यानंतर तर संपूर्ण कुटुंबच हादरून गेलं आहे.