Siya Goyal: अटक होणार हे सियाला होतं माहित, वाचण्यासाठी तिने लढवली होती नामी शक्कल, 'ते' गुपित उघड

सिया दोन मोबाईल वापरत होती. तिचे हे दोन्ही मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या मोबाईलच्या डेटा विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे
  • सिया आणि चेतन यांनी हत्येची पूर्ण तयारी केली होती आणि पोलिसांना पकडल्यास काय करावे याची माहिती गोळा केली होती
  • सियाने गुगलवर शोधून राजा रघुवंशी हत्येचा अभ्यास केला होता
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पुणे:

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मुख्य आरोप सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना आता न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. त्यामुळे हे दोघे ही आता तुरूंगाची हवा खात आहेत. पण हत्या करण्या पूर्वीचे त्यांचे एक एक कारनामे समोर येत आहे. पोलिसांनी जे काही पुरावे गोळा केले आहेत त्यातून हे समोर आले आहे. सिया आणि चेतन याने हत्येची पुर्ण तयारी केली होती. शिवाय त्यातून वाचायचे कसे याचे ही संशोधन केले होते. ऐवढेच काय तर पोलिसांनी पकडले तर काय करायचे याची ही माहिती त्यांनी मिळवली होती. ही सर्व माहित सियाने गोळा केली होती. त्यामुळे सियाला हत्या करण्यापूर्वीच आपल्याला पोलिस पकडणार हे माहित होते.  

हा सर्व कट रचत असताना सियाने सर्वात पहिले सोनम रघुवंशीने तिचा पती राजा रघुवंशीची केलेली हत्येचा अभ्यास केला. त्याची सर्व माहिती तिने मिळवली. ही माहिती तीने आपल्या गुगलवर सर्च केली होती. त्यातूनच तिने केतनची हत्या कशी करायची? काय केलं तर संशय आपल्यावर येणार नाही? हत्या केल्यानंतर काय करायचं याची माहिती गुगलच्या माध्यमातून मिळवली होती. ती ऐवढ्यावरच थांबली नाही. तिला माहित होतं की हत्या केल्यानंतर काही करून पोलिस आपल्यापर्यंत पोहोचणार. त्यावर तिने पोलिस कोठडीत महिलांना मारहाण केली जाते का? त्यांना थर्ड डिग्री दिली जाते का? याची माहिती ही सर्च केली होती. तिच्या गुगल हिस्ट्रीवरून ही माहिती समोर आली आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Lohagad Case: सिया-चेतनला मोठा दिलासा! बाहेर येण्याचा मार्ग मोकळा, कोर्टाच्या निर्णयाने पुणे पोलीसांना झटका

सिया दोन मोबाईल वापरत होती. तिचे हे दोन्ही मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या मोबाईलच्या डेटा विश्लेषणातून ही माहिती समोर आल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. चेतन ही आपल्या मोबाईलच्या माध्यमातून सियाच्या टच मध्ये होता. शिवाय ते बोलताना सांकेतिक भाषेचा वापर करत होते. ज्यावेळी त्यांना विश्वास पटला आणि त्याचा प्लॅन भन्नाट आहे हे समजेल त्याच वेळी त्यांनी पुढचे पाऊल टाकले. त्यांनी 18 जून रोजी गोड बोलून केतन अग्रवालला लोहगडावर नेले. ठरलेल्या प्लॅन प्रमाणे त्याला  विंचूकाटा या पॉईंटवर नेण्यात आले. तिथून त्याला थेट 400 फूट खोल दरीत ढकलण्यात आले. त्यानंतर तो घसरून पडला असा बनाव केला. केतनची हत्या करण्यात त्यांना यश आलं. 

नक्की वाचा - Siya Goyal: सिया गोयलचे 'ते' अश्लील कृत्य! त्यात ही आता नवा वाद, वडिलांनी केला भलताच दावा

केतन अग्रवालची हत्या झाल्यानंतर सिया अगदी सहज वावरत होती. तिचा हा व्यवहारच तिला जेलपर्यंत घेवून गेला. ज्यावेळी पोलिसांनी कसून चौकशी केली त्यावेळी तिने आपला गुन्हा कबुल केला. शिवाय यात चेतन चौधरी ही सहभागी असल्याचं समोर आहे. या तपासात तिची गुगल हिस्ट्री ही महत्वाची ठरली. यावरच तिने अनेक गोष्टी सर्च केल्या होत्या. पण ही हिस्ट्री ती डिलट करण्यास विसरली. तोच पुरावा पोलिसांच्या हाती लागला. राजा रघुवंशी हत्येत ज्या चुका सोनमने केल्या होत्या त्या टाळून आपण केतनला संपवू आणि सहज सुटू असं सियाला वाटत होतं. पण तिचा हा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. सध्या सिया आणि चेतन दोघे ही न्यायालयीन कोठडीत आहे. 16 जुलैपर्यंत त्यांना ही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Topics mentioned in this article