- सिया गोयलच्या नाईट लाईफ आणि दारू पिण्याच्या सवयीचे व्हिडीओ समोर आले आहेत
- सियाला केतनसोबत लग्न करायचे नव्हते, तर तिचे चेतन चौधरीसोबत अफेअर असल्याचे उघड झाले आहे
- सिया पोलिस कोठडीत असताना तिने प्रसारमाध्यमांकडे बोट दाखवत अश्लील कृत्य केलं होतं
केतन अग्रवाल हत्या प्रकरणानंतर मुख्य आरोपी असलेल्या सिया गोयलबाबत अनेक गोष्टी समोर येत आहेत. तिचं नाईट लाईफ असेल किंवा तिची दारू पिण्याची सवय असेल त्याचे व्हिडीओ ही समोर आले. ऐवढच काय तर सियाला केतन सोबत लग्न करायचं नव्हतं. तिचं चेतन चौधरी सोबत अफेअर असल्याचं ही आता उघड झालं आहे. श्रीमंत घरातील बिघडलेली मुलगी अशी जणू तिची प्रतिमा तयार झाली. त्यात ही पोलीस कोठडीत असताना तिचा उर्मटपणा ही दिसून येत होता. त्याच वेळी तिने प्रसारमाध्यमांच्या दिशेने अश्वील हावभाव केले. त्यानंतर तर सियावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली. आता त्या कृतीबाबत ही नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
सियाचा तो मिडल फिंगर दाखवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरादार व्हायरल झाला. त्यानंतर ती किती मुजोर आहे अशा प्रतिक्रीया उमटू लागल्या होत्या. एखाद्या व्यक्तीची हत्या केल्यानंतर ही ऐवढा उर्मटपणा येतू कुठू असा प्रश्न ही निर्माण झाला होता. मात्र सियाने केलेली ती कृती अश्लील नव्हती असा दावाच तिचे वडील प्रविण गोयल यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्या प्रमाणे सियाला पोलिसांनी व्हेरीफिकेशनसाठी घरी आणले होते. घरी आणताना तिचा हात पोलिसांच्या कारच्या दरवाज्यात सापडला होता. त्यात तिच्या बोटांना दुखापत झाली. तिच्या बोटाचे नख ही निघाले होते. शिवाय बोटांना सुट आली होती. त्यात तिला बऱ्याच वेदना होत होता.
तिला झालेली दुखापत आणि होणाऱ्या वेदना दाखवण्यासाठी तिने तिचे बोट दाखवले होते. पण त्याचा सर्वांनीच चुकीचा अर्थ काढला. तिने कोणतेही अश्वील हावभाव केले नव्हते. तर तिला झालेली दुखापत तिला प्रसार माध्यमांना दाखवायची होती असा दावा प्रविण गोयल यांनी केला आहे. याबाबत जर कुणाला शंका वाटत असेल तर याबाबत पोलिसांकडे ही चौकशी करावी असं ते म्हणाले. तिथं उपस्थित असलेले पोलिस याबाबत नक्कीच खरं काय ते सांगतिल असं ही त्यांनी सांगितलं. मात्र तिने कोणते ही अश्लील कृत्य केलेले नाही असं प्रविण गोयल यांनी स्पष्ट करत आपल्या मुलीची बाजू घेण्याचा प्रयत्न केला आहे.
सिया गोयल प्रकरणात वेगवेगळ्या गोष्टी रोज समोर येत आहेत. आता सियाची रवानगी ही न्यायालयीन कोठडीत झाली आहे. पोलीस कोठडी मिळावी यासाठी सरकारी पक्षाने मागणी केली होती. मात्र कोर्टने ती फेटाळली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सियाच्या जामीनाचा अर्ज ही दाखल केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिया आणि चेतन चौधरी यांनी मिळून केतन अग्रवालचा हत्या केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पोलिसांना तसे पुरावे मिळाल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या प्रकरणात काय वळणं येतात ते पाहावं लागणार आहे.