Dombivli Accident News Today : डोंबिवलीतील पेंढारकर कॉलेज परिसरात बुधवारी एका भरधाव कारने विरुद्ध दिशेने येत दोन कार आणि एका रिक्षाला जोरदार धडक दिली.या अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने मोठी घटना तळली आहे. मात्र दोन जण किरकोळ जखमी असल्याची माहिती काही नागरिकांनी दिली आहे.या अपघातामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली,तर वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला.डोंबिवली-कल्याण शिळ मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते.या वाहतूक कोंडीला टाळण्यासाठी अनेक वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहन चालवण्याचा धोका पत्करत असल्याचे चित्र वारंवार दिसून येते.अशाच प्रकारातून हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
नक्की वाचा >> Pratap Sarnaik: मराठी न बोलणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांचं काउंटडाऊन सुरू, या तारखेनंतर होणार कठोर कारवाई
ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत काय म्हणाले?
या मार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीसह 'राँग साईड'ने वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत यांनी म्हटलंय की, "दररोज वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक नागरिक आणि विद्यार्थी त्रास सहन करतात त्यामध्ये काही मुजोर वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहना घेऊन प्रवास करतात.
नक्की वाचा >> Ulhasnagar News : उल्हासनगरचा 'तो' परिसर, एक घरातून विद्यार्थ्यांना विकला जातोय गांजा, पालकांमध्ये घबराट
त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवते. आज जी घटना घडली यामध्ये वाहनांच्या नुकसान तर झालच आहे.परंतु,पोलिसांचा वचक न राहिल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. वाहतूक कोंडी कशी कमी होणार, याकडे पोलीस प्रशासनाने त्वरित उपाययोजना केली पाहिजे. कठोर कारवाई केली पाहिजे".