SSC Result : दहावीचा निकाल काही तासांवर, कधी आणि कुठे पाहाल? आताच लिंक सेव्ह करून ठेवा!

विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज पाहता येणार आहे. गुणपडताळणी आणि छायाप्रत मिळविण्यासाठी 28 मे ते  11 जूनपर्यंत अर्ज करता येईल.  

Advertisement
Read Time: 1 min
पुणे:

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून HSC बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून दुपारी 1 वाजता निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दहावीचा निकाल काही तासांवर येऊन ठेपला असल्याकारणाने विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली आहे. 

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे मार्च 2024 मध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज पाहता येणार आहे. गुणपडताळणी आणि छायाप्रत मिळविण्यासाठी 28 मे ते  11 जूनपर्यंत अर्ज करता येईल.  

नक्की वाचा - पायल कपाडियाने कान्समध्ये रचला इतिहास, यापूर्वीही देशासाठी केलीय अशी महत्त्वपूर्ण कामगिरी

दरम्यान तुम्ही दहावीचा निकाल ऑनलाइन पाहू शकता. यासाठी दुपारी एक वाजता पुढील संकेतस्थळांना भेट द्या.

निकाल पाहण्यासाठी क्लिक करा...

Maharashtra 10th SSC Result 2024 Website Link 

https://mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://sscresult.mahahsscboard.in

https://results.digilocker.gov.in

https://results.targetpublications.org