आता शालेय पोषण आहारात अंडा-सोयाबीन पुलाव अन् मोड आलेली कडधान्य, 15 नव्या पदार्थांचा समावेश

राज्य शासनाने शाळकरी मुलांचा पोषण आहारात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

खिचडी, वरण-भात अशा मर्यादित खाद्यपदार्थांऐवजी आता शालेय पोषण आहाराअंतर्गत विद्यार्थ्यांना अधिक चवदार पदार्थ खायला मिळणार आहे. राज्य शासनाने शाळकरी मुलांचा पोषण आहारात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

शाळकरी आहारामध्ये स्थानिक उपलब्ध अन्नधान्य, तृणधान्य आणि अन्य पदार्थांचा समावेश करुन आहाराचा दर्जा, पौष्टिकता वाढवण्याता प्रयत्न करण्यात आला आहे.  शालेय मुलांच्या पोषणासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा यासाठी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना आहाराचा लाभ देण्यासाठी वेगवेगळ्या पाककृतीसह योजनेमध्ये सुधारणा केल्या आहेत. या 
योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्यात येत आहेत. 

शालेय परसबागेतील उत्पादित भाजीपाला , फळे यांचा समावेश विद्यार्थ्यांच्या आहारात होत असल्याने विद्यार्थ्यांना ताजा सकस आहार मिळण्यास मदत होत आहे. तीन संरचित आहार पध्दतीमध्ये तांदूळ, डाळी / कडधान्यापासून तयार केलेला आहार, मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस) आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर व नाचणीसत्व यांच्यासह नविन पाककृतींचा समावेश करण्यात आला आहे. 

नक्की वाचा - पश्चिम रेल्वेची वाहतूक उशीराने, मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम; ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी

शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून पाककृती सुधारणा समितीने सुचविलेल्या 15 प्रकारच्या पाककृतींच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ घेता येणार आहे. 

पाककृती नाव

व्हेजिटेबल पुलाव

मसाले भात

मटार पुलाव

मुगडाळ खिचडी

चवळी खिचडी

चणा पुलाव

सोयाबीन पुलाव

अंडा पुलाव

मोड आलेल्या मटकीची उसळ

गोड खिचडी

मुग शेवगा वरण भात

तांदळाची खीर

नाचणीचे सत्व

मसुरी पुलाव

मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस)