Kalyan News: कल्याण-डोंबिवली,अंबरनाथ,बदलापूरला वादळाचा तडाखा, नागरिकांमध्ये घबराट, पाहा काय काय घडलं? Video

कल्याण-डोंबिवली,अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात वातावरणात अचानक बदल झाल्याचं पाहायला मिळालं. सकाळपासून आकाश ढगाळ राहिल्याने पावसाची दाट शक्यता वर्तवली जात आहे. वादळाचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Unseasonal Rain And Storm Video Viral

Stormy Wind Viral Video : कल्याण-डोंबिवली,अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात वातावरणात अचानक बदल झाल्याचं पाहायला मिळालं. सकाळपासून आकाश ढगाळ राहिल्याने पावसाची दाट शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान,वांगणी परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊसही पडला. दुपारनंतर अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाल्याने अनेक ठिकाणी नागरिकांची तारांबळ उडाली.जोरदार वाऱ्यामुळे काही भागातील घरांवर झाडे कोसळली.तर कल्याणमधील एपीएमसी परिसरात एका हॉलच्या शेडवरील पत्रे उडाल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. 

रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांचे मोठे नुकसान

रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अचानक बदललेल्या हवामानामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी जोरदार वाऱ्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी,असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Advertisement

नक्की वाचा >> Kalyan News: कल्याणच्या 'या' भागात कचऱ्याचे साम्राज्य, चक्क नाल्यातच क्रिकेट खेळून मनसेनं केलं अनोखं आंदोलन

यंदा महाराष्ट्रात पाऊस उशिराने दाखल होणार?

मुंबई हवामान विभागाकडून 7 आणि 8 मे 2026 रोजी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला होता. मागील काही दिवसांपासून अनेक भागात उष्णतेच्या झळा पसरल्याचं पाहायला मिळालं. अशातच हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. गतवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. परंतु, यंदा महाराष्ट्रात पाऊस उशिराने दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.तत्पूर्वी अनेक ठिकाणी वादळी वारे वाहत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

नक्की वाचा >> Ratnagiri News : रत्नागिरीत 'या' ठिकाणी CNG गॅसची टंचाई, वाहनांच्या लागल्यात लांबच लांब रांगा, चालक मेटाकुटीला