हिजाब, बुरख्यावर बंदी घालणाऱ्या पत्रकावर सुप्रीम कोर्टाची स्थगिती, मुंबईच्या कॉलेजांना द्यावं लागेल उत्तर

मुंबईतील खासगी महाविद्यालयांमध्ये हिजाब, निकाब, बुरखा घालण्यावर बंदी घालणाऱ्या परिपत्रकावर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. 

जाहिरात
Read Time: 1 min
नवी दिल्ली:

मुंबईतील खासगी महाविद्यालयांमध्ये हिजाब, निकाब, बुरखा घालण्यावर बंदी घालणाऱ्या परिपत्रकावर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. मुंबईतील खासगी महाविद्यालयांमध्ये हिजाब, निकाब, बुरखा, चोरी, टोपी घालण्यावर बंदी घालणाऱ्या परिपत्रकावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती घातली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कॉलेज प्रशासनाला नोटीस बजावून उत्तर मागवले आहे.  

वास्तविक, मुंबईच्या एनजी आचार्य आणि डीके मराठे कॉलेजने हिजाब, निकाब, बुरखा, स्टोल, टोपी घालण्यावर बंदी घातली आहे. ⁠याविरोधात नऊ मुलींनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने हा अर्ज फेटाळला होता.यावेळी सर्वोच्च न्यायालयाकडून बरेच प्रश्न उपस्थित करण्यात आले. कोणी कपाळावर टिळा लावला म्हणून काॅलेजमध्ये प्रवेश नाकारतां येतो का? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाकडून विचारण्यात आला. 

Advertisement


Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world