- प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी
Supriya Sule Daughter Marriage News: महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार पक्ष) नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे (Revati Sule) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी (Arun Lakhani) यांचे सुपुत्र सारंग लखानी (Sarang Lakhani) यांच्याशी रेवती सुळेचा विवाहसोहळा निश्चित करण्यात आलाय. या नव्या सोयरिकीमुळे पवार कुटुंब (Sharad Pawar) आणि नागपूरचे लखानी कुटुंब नात्याने जोडले जाणार आहेत. या विवाहाची चर्चा राज्यभर रंगली आहे.
कोण आहेत सारंग लखानी? | Who Is Sarang Lakhani
सारंग लखानी हे नागपूर शहरातील प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातील सदस्य आहेत. विश्वराज ग्रुपचे (Vishvaraj Group) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांचे पुत्र आहेत. सारंग यांची ओळख केवळ एक व्यावसायिक म्हणूनच नव्हे तर ते एक उत्तम बॅडमिंटनपटू सुद्धा आहेत. त्यांनी आजवर विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवलाय. उच्चशिक्षित आणि क्रीडाप्रेमी असलेल्या सारंग यांच्याशी रेवती सुळे यांचा विवाह होणार असल्याने दोन्ही कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
राजकीय आणि व्यावसायिक संबंधांची चर्चा | Revati Sule
या विवाहाच्या निमित्ताने एक विशेष बाब अधोरेखित होत आहे, ती म्हणजे लखानी कुटुंबाचे राजकीय संबंध. अरुण लखानी हे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे अत्यंत जुने आणि निकटवर्तीय मित्र मानले जातात. अरुण लखानी हे स्वतः महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. राजकीयदृष्ट्या शरद पवार आणि नितीन गडकरी यांचे संबंध मैत्रीपूर्ण राहिले आहेत.
रेवती सुळे आणि सारंग लखानी फोटो
रेवती सुळे या सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांच्या कन्या आहेत. त्या पवार घराण्याच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात. रेवती राजकारणापासून दूर असतात, पण अनेक सामाजिक उपक्रम आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये त्या सुप्रिया सुळे यांच्यासोबत दिसतात. दरम्यान रेवती आणि सारंग यांच्या विवाहाची तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही.