धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा पाठिंबा मिळत असल्याने सर्वेक्षणांचं कामही वेगात सुरु आहे. धारावी पुनर्विकासाच्या दृष्टीने सर्वेक्षणाचे काम सध्या प्रगतीपथावरती आहे. घरोघरी सर्वे सुरू आहे. जवळपास 10 हजार लोकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, अशी माहिती धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही.आर श्रीनिवास यांनी दिली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मार्च 2025 पर्यंत सर्वेक्षणाची काम पूर्ण करण्याचा संकल्प आहे. रेल्वेची जमीन आम्हाला मिळाली आहे. तीन ते चार महिन्यात तिथे काम सुरू होईल. अशा मोठ्या प्रकल्पात लोकांचे समज-गैरसमज होणे स्वाभाविक आहे. पात्र लोकांना धारावीमध्येच मोफत घर मिळणार आहे. तर अपात्र लोकांनाही घर मिळणार आहे, अशा माहिती एस.व्ही.आर श्रीनिवास यांनी दिली.
धारावीमधील प्रत्येकाला घर मिळणार आहे. पात्र लोकांना 350 चौरस फुटांचे घर मिळणार आहे. एसआरए पेक्षा जास्त अधिक चौरस फुटाचे घर मिळणार, असंही एस.व्ही.आर श्रीनिवास यांनी सांगितलं.
(नक्की वाचा - अदाणी समूह फक्त विकासक, धारावीची जमीन राज्य सरकारला हस्तांतरित होणार, सूत्रांच्या हवाल्याने PTI चे वृत्त)
धारावी पुनर्विकास प्रकल्पातून रहिवाशांचे जीवनमान उंचावण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी अद्यावत पायाभूत सुविधा, दळणवळणासाठी आंतरराष्ट्रीय सुविधा, तरुणांसाठी कौशल्य विकास अभ्यासक्रम, पर्यावरण पूरक व्यवसायाभिमुख प्रशिक्षण,अद्यावत रुग्णालय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा, खेळाची मैदाने अशा विविध सुविधा या पुनर्विकास प्रकल्पात दिल्या जाणार आहेत.
(नक्की वाचा - या दयनीय अवस्थेत आणखी किती दिवस जगायचे? विकासाची आस लागलेल्या धारावीकरांचा संतप्त सवाल)
महाराष्ट्र राज्य सरकारची धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट (डीआरपी) आणि अदानी समूहाची धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल) या दोन कंपन्यांच्या भागीदारीतून धारावी पुनर्विकास प्रकल्प राबवला जात आहे.