अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयने मुंबईच्या कोर्टात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणी रिया चक्रवतीने सुशांतच्या घरच्यांवर काही आरोप केले होते. तर सुशांतच्या कुटुंबीयांनी रियाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. या दोन्ही केसमध्ये सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केले आहे. 2020 साली सीबीआयने ही केस आपल्या हातात घेत चौकशी सुरू केली होती. चार वर्षाच्या चौकशीनंतर क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात जो क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे त्यात रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांना क्लिन चिट देण्यात आली आहे. रिपोर्ट आणि सुत्रांची अशी माहिती आहे. सुशांतला कुणी आत्महत्या करण्यासाठी दबाव टाकत होतं, असा कुठला ही पुरावा सीबीआयला चौकशीत मिळाला नाही. अशी माहिती सुत्रांची आहे. दरम्यान या क्लोजर रिपोर्ट नंतर सुशांतच्या कुटुंबीयांना प्रोटेस्ट पिटिशन दाखल करण्याची मुभा आहे.
सीबीआयने एम्सच्या तज्ज्ञांकडून सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची तपासणी केली होती. एम्सच्या फॉरेन्सिक टीमला ही काही चुकीचं असं आढळलं नाही. शिवाय सुशांत आणि रिया चक्रवर्ती यांच्या संभाषणाची तपासणी ही अमेरिकेत करण्यात आली. त्यात त्यांच्या चॅटमध्ये कुठेही हेराफेरी केली गेली नव्हती हे समोर आले आहे. रिया चक्रवर्ती ही सुशांत सिंह बरोबर रिलेशनशिप मध्ये होती. या प्रकरणाची चौकशी झाली पाहीजे अशी मागणी तिनेच गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती.
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातून रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा मिळाला आहे. सुशांतची आत्महत्या की हत्या अशी चर्चा त्यावेळी झाली होती. शिवाय त्याला आत्महत्या करण्यासाठी उकसवलं गेलं होतं. त्याच्यावर दबाव टाकला होता असा आरोप रिया चक्रवर्तीवर आरोप करण्यात आले होते. हे आरोप सुशांतच्या कुटुंबीयांनी केले होते. मात्र त्याबाबतचा कुठलाही पुरावा सीबीआयला मिळाला नाही. त्यामुळे रिया चक्रवर्तीला चार वर्षांनी या प्रकरणी दिलासा मिळाला आहे.