
दिशा सालियान प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यात खासदार नारायण राणे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची दाट शक्यता आहे. दिशा सालियान प्रकरणाची ज्यावेळी चर्चा होती. शिवाय याबाबत आपण आरोप केले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांचे आपल्याला एकदा नाही तर दोन वेळा फोन आले होते. शिवाय या प्रकरणात आदित्यचे नाव घेवू नये अशी विनंतही त्यांनी त्यावेळी केली होती, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. शिवाय दोघामध्ये काय चर्चा झाली याचा तपशील ही त्यांनी सविस्तर पणे दिला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उद्धव ठाकरे यांनी मला दोन फोन केले होते हे सत्य आहे असं नारायण राणे म्हणाले. पहिला फोन हा ज्यावेळी आपण जुहू इथल्या घरी चाललो होतो. ज्यावेळी वांद्रे क्रॉस केले त्यावेळी मिलींद नार्वेकर यांचा फोन आला. साहेबांना बोलायचं आहे असं त्यांनी मला सांगितलं. त्यावर कोण साहेब असं मी त्यांना विचारलं त्यावर उद्धवजी बोलणार आहेत, असं नार्वेकरांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी फोन उद्धव ठाकरेंनी दिला. त्यावर मी त्यांना जय महाराष्ट्र म्हणालो. तुम्ही अजूनही जय महाराष्ट्र बोलता असं उद्धव मला म्हणाले, असं राणेंनी सांगितलं.
पुढे बोलताना उद्धव म्हणाले की, तुम्हाला ही मुलं आहेत. मला ही मुलं आहेत. तुम्ही पत्रकार परिषदेत आदित्यचं नाव घेत आहात. तुम्ही त्याचा उल्लेख करु नका ही विनंती करायला फोन केला आहे असं ठाकरे म्हणाले. त्यावर मी त्यांनी, उद्धवजी एक गोष्ट लक्षात घ्या, मी कुणाचे ही नाव घेतले नाही असं त्यांना सांगितलं. शिवाय एका मुलीची हत्या झालीय. ज्यांनी अत्याचार आणि हत्या केली त्यांना शिक्षा झाली पाहीजे असं आपलं मत असल्याचं मी उद्धव ठाकरे यांना सांगितलं. शिवाय तुमच्या मुलाला सांभाळा. ते जे काही करत आहे ते चुकीचं आहे असंही आपण सांगितल्याचं राणे म्हणाले.
त्यावर मी काय आहे ते पाहातो. तुम्ही सहकार्य करा अशी पुन्हा एकदा विनंत उद्धव ठाकरे यांनी आपल्याला केली. त्यानंतर मी त्यांनी ठिक आहे असं म्हटलं. असं पहिल्या वेळी संभाषण झाल्याचं राणे यांनी दावा केला आहे. दुसरा फोन कोविडच्या काळात आला होता असं ही राणे यांनी सांगितलं. त्यावेळी आपल्या हॉस्पिटलचं उद्घाटन होतं. राज्याकडे एक परवानगी हवी होती. त्यासाठी आपण त्यांना फोन केला होता. त्यानंतर त्यांचा फोन आला होता. आपण त्यांना कॉलेजच्या परवानगीसाठी फोन केला होता असं सांगितलं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रेस घेताना आदित्यचा उल्लेख टाळा असं पुन्हा एकदा सांगितलं होतं. मी केवळ एक मंत्री आहे असं बोललो आहे हे त्यांना सांगितलं. फोन एकमेकांना येत असतात. तसे हे दोन फोन झाले होते असं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान दिशा सालियान हिच्या पालकांवर त्यावेळी मोठ्या प्रमाणात दबाव होता. त्यांना पोलिस, आरोग्य यंत्रणा कुणीच मदत करत नव्हते. रुग्णवाहिका ही त्यावेळी बदलली गेली होती. प्रकरण दडपण्यासाठी अनेक गोष्टी केल्या गेल्या असा दावाही राणे यांनी यावेळी केला. आम्ही कधीही दिशाच्या पालकांना भेटलो नाही. त्यांना जे भेटले त्यांची चौकशी झाली पाहीजे. शिवाय जे पुरावे पोलिसांकडे आहेत त्या आधारे गुन्हा दाखल झाला पाहीजे असं ही राणे म्हणाले. या प्रकरणात कुणीही सुटणार नाही,असं सांगायला ही राणे विसरले नाहीत. मला जेवणावर बसलो असताना अटक केली. आता तुम्हाला ही सोडणार नाही असं ही ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world