स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करणारा नराधम दत्तात्रय गाडेला पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल 75 तासांच्या अथक शोधमोहिमेनंतर पुणे पोलिसांनी हे यश मिळालं. शिरुर तालुक्यातील गुनाट गावातील नागरिकांनी आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. दत्तात्रय गाडेची माहिती देणाऱ्यांना पोलिसांना 1 लाखांचं बक्षीस देखील जाहीर केलं होतं. त्यामुळे पुणे पोलिसांकडून मिळणारं एक लाखांचं बक्षीस आता कुणाला मिळणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात अनेकांची मदत झाली. गुनाट गावात आरोपी कुठे लपला आहे याची माहिती देणाऱ्या ग्रामस्थांचीही पोलिसांना मोठी मदत झाली. याबाबत बोलताना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलं की, ज्यांनी शेवटच्या क्षणाला आरोपी कुठे आहे? याबाबतची माहिती दिली, त्या व्यक्तीला एका लाखाचे बक्षीस दिले जाईल. तसेच गुनाट गावासाठी काय करता येईल, याबाबतही आम्ही विचार करु. आम्ही गावात जाऊन गावकऱ्यांचा सत्कार करणार आहोत, असं म्हणत एका लाखाच्या बक्षीसाबाबत अमितेश कुमार यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
(नक्की वाचा- Pune Rape : ...तर 'ती' वासनेचा बळी झाली नसती! स्वारगेट स्थानकात सुरु होते 'हे' काळे धंदे; वाचा स्फोटक रिपोर्ट)
आरोपी दत्तात्रय गाडेला कसं पकडलं?
पोलिसांनी ज्या शेतात दत्ता गाडेला शोधण्यासाठी सर्च ॲापरेशन सुरु केलं होतं तिथं तो नव्हताच. आरोपी रात्री नोतेवाईक महेश बहीरट यांच्या घरी 10.30 वाजता आला होता. त्यानंतर तो आल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली. दत्ता गाडेने नातेवाईकांकडून पाण्याची बाटली घेतली. माझी मोठी चुक झालीय, मला सरेंडर करायचं असं सांगून तो तिथून निघून गेला.
(नक्की वाचा- Swargate Rape Case: पीडितेसोबत सहमतीने संबंध? स्वारगेट अत्याचार प्रकरणात 5 खळबळजनक खुलासे)
त्यानंतर पोलिसांनी या घराच्या परीसरात दत्ता गाडेचा शोध सुरु केला. डॅाग स्कॅाडही त्याठिकाणी आणले. पोलिसांना त्याचा बदलेला शर्ट सापडला. त्याआधारे डॅाग स्कॅाडने पुढील रस्ता पोलिसांना दाखवला. पण गाडे ज्या ठिकाणावरुन आला होता तिथे परतलाच नाही. तो नातेवाईकांच्या घराच्या परिसरात असलेल्या बेबी कॅनॅालमध्ये झोपून राहिला.
रात्री उशीरा दीड वाजता गुनाट याच गावातील प्राध्यापक गणेश गव्हाणे आणि ग्रामस्थ यांना दत्ता गाडे दिसला. यानंतर त्यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान आरोपी आणि ग्रामस्थ यांच्यात झटापट देखील झाली. मात्र ग्रामस्थांनी आरोपीला पकडून ठेवले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. धक्कादायक बाब म्हणजे दत्ता गाडे हा आत्महत्या करणार असल्याचेही समोर आले आहे.