1 day ago

Latest News Updates: गेल्या 17 वर्षांपासून सुरु असलेलं 'ऑपरेशन तहव्वूर' आता पूर्ण झालं आहे. मुंबईवर 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा गुन्हेगार भारताच्या ताब्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तहव्वूरला भारताला सोपवणार असल्याचं जाहीर केलं होतं. अर्थात हे अचानक झालेलं नाही. भारतानं यासाठी सातत्यानं अमेरिकेवर दबाव टाकला होता. अखेर अमेरिकेला भारताची मागणी मान्य करावी लागली.

Apr 11, 2025 21:24 (IST)

Live Update : CSK चा सुपर फ्लॉप शो, KKR विरुद्ध लाजीरवाणा रेकॉर्ड

आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) सामना सुरु आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं बॅटिंगमध्ये सपशेल निराशा केली. सीएसकेनं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 9 आऊट 103 रन केले. आयपीएलच्या इतिहासात चेन्नईतील चेपॉक मैदानावरील सीएसकेचा हा निराशाजनक स्कोअर आहे.

Apr 11, 2025 21:06 (IST)

Live Updates : नागपूर जिल्ह्यातील ॲल्युमिनियम कंपनीत स्फोट, कामगार अडकले

नागपूर जिल्ह्यातील उमरेडच्या ॲल्युमिनियम कंपनीत स्फोट झाला आहे. या स्फोटात  7-8 जण गंभीर जखमी असून त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. अल्युमिनियम फॉइल ची कंपनी असल्याने आग अजूनही आटोक्यात आलेली नाही. हा स्फोट कशामुळे घडला हे अद्याप समजलेले नाही. अजून काही लोक आत मध्ये अडकले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Apr 11, 2025 20:04 (IST)

मुंबईतील टँकरचालकांच्या संपावर तोडगा काढण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सुचना

मुंबईतील टँकरचालकांचा संप सुरु असल्याने काही भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. उन्हाळ्याचा काळ पाहता ही स्थिती अशीच राहणे योग्य नाही. त्यामुळे बदललेले नियम आणि टँकरचालकांच्या मागण्या यातून सुवर्णमध्य साधत, सामान्य जनतेला त्रास होणार नाही, यादृष्टीने तातडीने तोडगा काढावा, असे निर्देश मी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत. असं ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. 

Apr 11, 2025 18:19 (IST)

बुलढाण्यात उष्माघाताचा पहिला बळी

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील बारा वर्षीय संस्कार सोनटक्के या विद्यार्थ्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचं समोर आल्यानंतर बुलढाणा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी नागरिकांना काळजी घेण्याचा आवाहन केला आहे . शक्यतो उन्हाच्या वेळेस घराच्या बाहेर पडणे टाळावे , भरपूर पाणी प्यावं , तसंच उष्माघाताची लक्षणे व आढळल्यास तात्काळ शासकीय रुग्णालयात वैद्यकीय मदत घ्यावी अस आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी जनतेला केला आहे.

Advertisement
Apr 11, 2025 16:53 (IST)

SIS सचिव पदावरून देशमुख यांची तात्काळ हकालपट्टी

गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स (GIPE) आणि भारतीय सेवक समाज (SIS) यांच्यात सुरू असलेल्या वादांमध्ये आज मोठी घडामोड घडली आहे. SIS च्या नियामक मंडळाच्या बैठकीत  मिलिंद देशमुख यांची सचिवपदावरून तात्काळ हकालपट्टी करण्यात आली आहे. 

SIS अध्यक्ष पुढील आदेशापर्यंत संस्थेचा कार्यभार स्वतः सांभाळणार असून, आर्थिक पारदर्शकतेसाठी नवीन वित्त समितीची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान, GIPE कडून SIS अध्यक्षांवर वैयक्तिक न्यायालयीन लढ्यासाठी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे, मात्र SIS कडून हा आरोप पूर्णतः निराधार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Apr 11, 2025 16:08 (IST)

टँकर चालकांचा संप सुरूच राहणार

टँकर चालकांचा संप सुरूच राहणार आहे.  महाराष्ट्र सरकार जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत टँकरने पाणीपुरवठा बंद राहणार आहे.  केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्र सरकार यामध्ये प्रवीण दरेकर यांनी मध्यस्थी केली होती. पण त्यात तोडगा निघू शकला नाही.  यानंतर टँकर चालकांची बैठक झाली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Advertisement
Apr 11, 2025 16:01 (IST)

प्रशांत कोरटकरला विमानाने मुंबईला करण्यात आलं रवाना

कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून प्रशांत कोरटकरला बाहेर काढण्यात आलं आहे. त्याला पोलिस बंदोबस्तात बाहेर काढलं. यावेळी माध्यमाना चकवा देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्या बद्दल त्याला जेलची हवा खावी लागली होती. त्याला जामीन मिळाल्यानंतर तो आज बाहेर आला. प्रशांत कोरटकरला विमानाने मुंबईला रवाना करण्यात आलं आहे.  कळंबा कारागृहातून बाहेर काढल्यानंतर त्याला पोलीस बंदोबस्तात एअरपोर्ट पर्यंत नेलं.  एका खासगी वाहनातून कारागृहातून बाहेर काढलं.  तिथून 3 वाजताच्या विमानाने मुंबईला रवाना करण्यात आलं.  त्याची 50 हजार रुपयांच्या जातमुचालक्या आणि काही अटी शर्तीवर कारागृहातून सुटका करण्यात आली. 

Apr 11, 2025 15:39 (IST)

मंगेशकर कुटुंबावर केलेली टीका क्लेशदायक व लांच्छनास्पद – खा. सुनील तटकरे

काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वड्डेटीवार यांनी मंगेशकर कुटुंबीयांविषयी केलेले विधान हे अत्यंत क्लेशदायक, निषेधार्ह व लांच्छनास्पद असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.  “लता मंगेशकर, आशा भोसले, पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह मंगेशकर कुटुंबीयांनी देशाच्या सांस्कृतिक वैभवात मोलाचे योगदान दिले आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे संस्कार लाभलेल्या या कुटुंबाने भारतीय संगीताला जागतिक पातळीवर नेले. अशा परिवाराविषयी अवमानकारक शब्द वापरणे हे भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे,” असे तटकरे म्हणाले.

Advertisement
Apr 11, 2025 14:29 (IST)

सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा मोठी वाढ

सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. दोनच दिवसात सोने व चांदीच्या भावात प्रत्येकी 3500 रुपयांची वाढ झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्क धोरण जाहीर केल्यानंतर सोन्या चांदीच्या भावात घसरण झाली होती. मात्र इतर देशांनी अमेरिकेवर आयात शुल्क जाहीर केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या आयात शुल्क धोरणाला 90 दिवसांसाठी स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जागतिक पातळीवर सोन्याच्या गुंतवणुकीत मोठी वाढ झाली असून परिणामी सोन्याचे भाव हे ऐतिहासिक व विक्रमी दरावर पोहोचले आहेत. सोन्या चांदीच्या भावात चढ - उतार सुरू असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमाचे  वातावरण निर्माण झालं असून  ग्राहकांनी सोना खरेदी कडे पाठ फिरवली असल्याचे चित्र सराफा बाजारात निर्माण झाले आहे. 

Apr 11, 2025 14:11 (IST)

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयप्रकरणी पुणे महापालिकेने समितीचा अहवाल मंत्रालयात सादर

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयप्रकरणी आज पुणे महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल मंत्रालयात सादर 

माता मृत्यू अन्वेषण समिती जी पुणे मनपाकडून नियुक्त करण्यात आली होती, प्रकरणाच्या चौकशीसाठी त्या समितीचा अहवाल आज मंत्रालयात सादर करण्यात आला 

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या बद्दल ट्वीट करत तातडीने करवाई करण्यात यावी अशीही मागणी केली आहे.

Apr 11, 2025 13:22 (IST)

शक्तीपीठ महामार्गाला विरोध, हिंगोलीत माती परीक्षणाचे काम शेतकऱ्यांनी थांबवले

नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग हिंगोलीच्या कळमनुरी आणि वसमत तालुक्यातील गावांमधून जात आहे. मात्र या शक्तीपीठ महामार्गाला येथील शेतकऱ्यांचा विरोध होताना दिसत आहे. कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे शक्तीपीठ महामार्गाच्या माती परीक्षणाचे काम सुरू आले होते. मात्र डोंगरकडा येथील शेतकऱ्यांनी माती परीक्षणाचे काम थांबवल असून, काळी झेंडे देखील दाखवले आहेत. आमच्या सुपीक जमिनीवर शक्तीपीठ महामार्गाचे काम होऊ देणार नाही, असा पावित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय.

Apr 11, 2025 13:18 (IST)

लष्करी विभागातील लाचखोरीचा CBI कडून पर्दाफाश. नाशिकच्या तोफखाना आणि आर्मी एव्हिएशन सेंटरमधील अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल.

नाशिक : लष्करी विभागातील लाचखोरीचा CBI कडून पर्दाफाश.  नाशिकच्या तोफखाना आणि आर्मी एव्हिएशन सेंटरमधील 15 लष्करी अधिकाऱ्यांविरुद्ध 11 भ्रष्ट्राचाराचे गुन्हे दाखल. लेखापरीक्षक, सहाय्यक लेखाधिकारी आणि लिपिकांवर लष्करी कर्मचाऱ्यांकडून पैसे उकळण्याचा आरोप. वेळेवर वेतन व भत्ते देण्यासाठी लष्करी कर्मचाऱ्यांकडून आर्थिक फायदा घेतल्याचे उघड.

Apr 11, 2025 12:51 (IST)

Satara News : खेळताना झालेल्या भांडनानंतर 13 वर्षीय मुलीने 5 वर्षांच्या मुलीची केली हत्या

शेतात खेळताना झालेल्या भांडनानंतर 13 वर्षीय मुलीने 5 वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.  स्कार्पने गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. संबंधित 13 वर्षाची मुलगी पोलिसांच्या ताब्यात आहे. 

Apr 11, 2025 10:04 (IST)

भिडे वाड्याचे काम लवकर सुरू करा, मला आंदोलन करण्याची वेळ आणू देऊ नका- छगन भुजबळ

भिडे वाड्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.  तर एकनाथ शिंदेने देखील 100 कोटी रुपये पाठवून दिले आहेत.तरीदेखील काम सुरू झालेले नाही. जागा कमी पडत आहे. भिडे वाड्याचे काम लवकर सुरू करा,  मला आंदोलन करण्याची वेळ आणू देऊ नका असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे. 

Apr 11, 2025 09:24 (IST)

शेअर बाजारात उसळी, सेन्सेक्स 1000 अंकांनी वाढला, तर निफ्टी 22750 च्या वर उघडला

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजाराची सुरुवात तेजीने झाली. सेन्सेक्स 1045.60 अंकांच्या म्हणजेच 1.41 टक्क्यांच्या वाढीसह 74,891.99 वर व्यवहार करत होता. तर निफ्टी 359.85 अंकांच्या म्हणजेच 1.61 टक्क्यांच्या वाढीसह 22,746.40 वर व्यवहार करत होता.

Apr 11, 2025 09:24 (IST)

शेअर बाजारात उसळी, सेन्सेक्स 1000 अंकांनी वाढला, तर निफ्टी 22750 च्या वर उघडला

भारतीय बाजार तेजीत. सेन्सेक्स 1000 अंकांनी वाढला, तर निफ्टी 22750 च्या वर उघडला

Apr 11, 2025 09:21 (IST)

Satara News: पाच वर्षाच्या चिमुकलीची गळा चिरून हत्या, कराड तालुक्यातील वाठार गावातील धक्कादायक घटना

पाच वर्षाच्या चिमुरडीची गळा चिरून हत्या

साताऱ्यातील कराड तालुक्यातील वाठार गावातील धक्कादायक घटना 

संस्कृती रामचंद्र जाधव वय वर्ष 5 असं मृत मुलीचं नाव

सायंकाळी खेळायला बाहेर गेल्यानंतर संस्कृती घरी न परतल्याने रात्रभर शोधाशोध केल्यानंतर तिचा मृतदेह सापडला

मुलीचा गळा कापून डोके दगडाने ठेचल्याचे समोर, हत्येचे कारण अस्पष्ट

Apr 11, 2025 09:21 (IST)

Satara News: पाच वर्षाच्या चिमुकलीची गळा चिरून हत्या, कराड तालुक्यातील वाठार गावातील धक्कादायक घटना

पाच वर्षाच्या चिमुरडीची गळा चिरून हत्या

साताऱ्यातील कराड तालुक्यातील वाठार गावातील धक्कादायक घटना 

संस्कृती रामचंद्र जाधव वय वर्ष 5 असं मृत मुलीचं नाव

सायंकाळी खेळायला बाहेर गेल्यानंतर संस्कृती घरी न परतल्याने रात्रभर शोधाशोध केल्यानंतर तिचा मृतदेह सापडला

मुलीचा गळा कापून डोके दगडाने ठेचल्याचे समोर, हत्येचे कारण अस्पष्ट

Apr 11, 2025 09:08 (IST)

Latur News: विहिरीत बुडून दोन चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू;औसा शहरातील घटना

लातूरच्या औसा शहरात घराशेजारी खेळताना विहिरीत बुडून दोन चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू झाला आहे. यात चिमुकली आलीना समीर शेख 5 वर्ष आणि उस्मान समीर शेख वय 3 वर्ष या दोन्ही बहीण भावाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. शहरातील बुरान कब्रस्तान परिसरात शेक कुटुंबे राहतात. अलिना आणि उस्मान खेळताना विहिरीत पडले. औसा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

Apr 11, 2025 08:20 (IST)

मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई, 15 दिवसातच टँकरची संख्या तिपटीने वाढली

उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून तहानलेल्या गावांच्या संख्येत देखील भर पडत आहे. अशात टँकरच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरवातीलाच मराठवाड्यात पाणी टंचाईचे चटके जाणवत आहे. एवढच नाही तर पंधरा दिवसांतच टँकरची संख्या तिपटीने वाढली आहे. मराठवाड्यातील 93 गावं-वाड्यांना 127 टँकरद्वारे पिण्यासाठी पाणीपुरवठा करावा लागत आहे. सोबतच 140 खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता पुढील काळात टँकरच्या संख्येत भर पडले, असे चिन्ह आहे.

Apr 11, 2025 07:55 (IST)

पुणे रेल्वे स्थानकात फिरत्या जिन्यावरून पडून वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

पुणे रेल्वे स्थानकावर एका हृदयद्रावक घटनेत फिरत्या जिन्यावरून (एस्केलेटर) पडून एका ७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. 

अशोक प्रभाकर देशपांडे असे त्यांचे नाव आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सार्वजनिक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Apr 11, 2025 07:51 (IST)

Ratnagiri News : साखरपा लघु पाटबंधारे योजना धरण प्रकल्पाला गळती, पाणीसाठ्यात मोठी घट

संगमेश्वर तालुक्यातील साखरपा लघु पाटबंधारे योजना धरण प्रकल्पाला लागलेल्या गळतीमुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या ग्रामस्थांनी चिंता व्यक्त करत प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.

 

धरणाच्या पाण्यावर साखरपा, कोंडगाव आणि परिसरातील हजारो ग्रामस्थ अवलंबून आहेत. मात्र यावर्षी एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात पाणी साठा कमी झाल्याने या भागातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. सध्या धरणात 10 टक्के देखील पाणीसाठा शिल्लक नाहीय. त्यामुळे या धरणाच्या गळतीकडे पाटबंधारे विभागाने तात्काळ लक्ष देऊन याची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

Apr 11, 2025 07:18 (IST)

जळगावात वावडदा फाट्याजवळ भरधाव मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील वावडदा फाट्याजवळ भरधाव मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वरील दोन जण जागीच ठार झाले असून एक तरुण हा गंभीर जखमी झाला आहे. भावेश पाटील व महेंद्र जाधव असे अपघातात ठार झालेल्यांची नावे असून अपघातानंतर  मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले असून अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणावर देखील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Apr 11, 2025 07:18 (IST)

स्वारगेट बलात्कार प्रकरण, तरुणीला तीन लाखांचे 'मनोधैर्य' रक्कम

राज्य सरकारकडून स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणातील २६ वर्षीय तरुणीला राज्य सरकारच्या 'मनोधैर्य' योजनेअंतर्गत केली जाणार ३ लाख रुपयांची आर्थिक मदत.

तरुणीच्या मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनासाठी 'मनोधैर्य' योजनेअंतर्गत आर्थिक मदत देण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून तीन लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे,