Video :"रतन टाटाजी माझ्या कंपनीत..",महिला ताज हॉटेलच्या मॅनेजरवर भडकली, बसण्याच्या स्टाईलमुळे झाला वाद अन्..

Woman in Taj Hotel Viral Video : ताज हॉटेलमध्ये जाऊन डिनर किंवा लंच करणं म्हणजे अनेकांसाठी एक पर्वणीच असते. पण नुकतच  एका महिलेचा ताज हॉटेलमधील व्हिडीओ व्हायरल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Woman Viral Video
मुंबई:

Woman in Taj Hotel Viral Video : ताज हॉटेलमध्ये जाऊन डिनर किंवा लंच करणं म्हणजे अनेकांसाठी एक पर्वणीच असते. पण नुकतच  एका महिलेचा ताज हॉटेलमधील व्हिडीओ व्हायरल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ताज हॉटेलमध्ये एक महिला डिनर करण्यासाठी गेली होती. ती ताज हॉटेलच्या टेबलवर जेवत असताना खुर्चीवर पाय दुमडून बसली होती. त्यानंतर हॉटेलचा मॅनेजरने तिला खुर्चीवर बसण्याची पद्धत शिकवली. पण त्या महिलेला ताज हॉटेलमधील हे नियम अजिबातच पटले नाहीत. त्या महिलेनं एक व्हिडीओ रेकॉर्ड करत ताज हॉटेलमधील आगळ्यावेगळ्या नियमावलीचा पर्दाफाश केला आहे. डायनिंग टेबलवर जेवण करताना त्या महिलेसोबत नेमकं काय घडलं? व्हायरल व्हिडीओ नक्की पाहा..

त्या महिलेसोबत ताज हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं?

महिलेनं शेअर केलेल्या व्हिडीओत ती म्हणते, "मला खूप राग आला आहे. मी माझ्या बहिणीसोबत ताज हॉटेलमध्ये आहे. ताज हॉटेलमध्ये दिवाळीत डिनर पार्टी करण्याचा प्लॅन केला.ताजच्या मॅनेजरने मला म्हटलं की, एक समस्या आहे. तो म्हणाला हे फाईन डायनिंग आहे. इथे खूप श्रीमंत लोक येतात. तुम्हाला पद्धतशीर बसावं लागेल. तुम्ही पाय दुमडून बसू शकत नाहीत. ताज हॉटेलबद्दल मला खूप आदर आहे.रतन टाटाजी माझ्या कंपनीत इन्वेस्टर होते.पण मला असे प्रश्न विचारल्याबद्दल मी ताजबद्दल खूप नाराज आहे".

नक्की वाचा >> 'मुंबई महापालिका एकत्र लढणार, पण ठाण्यात...' भाजपच्या बड्या नेत्यानं उडवली खळबळ

इथे पाहा महिलेचा व्हायरल व्हिडीओ

योरस्टोरीची फाऊंडर आणि सीईओ श्रद्धा शर्माने ताज हॉटेलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. ताज हॉटेलच्या फाईन डायनिंग रेस्टॉरंटमध्ये (हाऊस ऑफ मिंग) पाय दूमडून बसल्याने येथील कर्मचाऱ्यांनी अपमानित केल्याचा आरोप या महिलेनं केला आहे. ताज हॉटेलमध्ये कसं बसायचं? असं ते मला शिकवत होते, त्यामुळे मी त्यांच्यावर प्रचंड नाराज आहे, असं त्या महिलेनं व्हिडीओत म्हटलं आहे.

श्रद्धा शर्मा यांनी एक्सवर म्हटलं, एक सामान्य व्यक्ती, जो कठोर मेहनतीने पैसे कमावतो. आपली गरिमा राखून ताज हॉटेलमधअये येतो. त्या व्यक्तीला आजही या देशाता अपमानित व्हावं लागतं. माझी काय चूक आहे? मी फक्त रेग्युलर पद्मासनमध्ये बसले, ही माझी चूक आहे का? मी कसं बसलं पाहिजे? हे मला ताज हॉटेलचे कर्मचारी शिकवत आहेत. 

Advertisement

नक्की वाचा >> "पुणे कोणाच्या बापाचं नाही..परत या", पुण्यात 'स्थानिक विरुद्ध बाहेरील' वाद पेटला..'ते' पोस्टर प्रचंड व्हायरल!