
BJP Senior Leader Big Statement : येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. अशातच मुंबई महानगर पालिका आणि ठाणे मनपाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षासह सत्ताधाऱ्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने राजकीय पलटावर अनेक राजकीय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत ठाकरे ब्रँड नवी उभारी घेत असल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अशातच भाजपच्या बड्या नेत्यानं माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत आम्ही (महायुती) एकत्र लढणार आहोत. पण ठाणे महापालिकेत युती म्हणून लढायचं की, 'एकला चलो रे'चा नारा द्यायचा, याबाबतचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवला आहे.
भाजपचा मोठा नेता नेमकं काय म्हणाला?
भाजपचा वरिष्ठ नेता माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले, "महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कोणतीही बदल होणार नाही. मंत्रिमंडळाला आतापर्यंत एक वर्षही पूर्ण झालं नाहीय. एका वर्षानंतर आम्ही सर्व मंत्र्यांच्या कामकाजाचं अवलोकन करू, त्यानंतरच पुढचे निर्णय घेतले जातील. ठाणे महानगरपालिकेत स्वबळावर लढण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. भाजपच नाही, तर अन्य पक्षांनीही याबाबत काही ठरवलं नाहीय.सर्व महानगरपालिकांमध्ये आम्ही (महायुती) एकत्र लढू अशी परिस्थिती नाहीय. कारण अनेक ठिकाणी आम्ही नंबर एक आहोत. तर काही ठिकाणी दुसऱ्या नंबरवर, त्यामुळे आमचंच नुकसान होईल. अशा परिस्थितीत काही ठिकाणी आम्ही वेगळे लढू. काही ठिकाणी आम्ही एकटे लढू, तर काही ठिकाणी एकत्र निवडणूक लढवू. पण निवडणुकीनंतर आम्ही एकत्रच राहू. महायुतीचाच महापौर बनवू",असं मोठं विधान या भाजप नेत्यानं केलं आहे.
नक्की वाचा >> Mumbai Crime : नवी ओळख..3 पासपोर्ट अन् खोट्या पदव्या..BARC चा बोगस शास्त्रज्ञ कसा बनला 'अलेक्झांडर पामर', खळबळजनक माहिती समोर
"ठाकरे ब्रँड एकचा होता..बाळासाहेब ठाकरे"
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबत भाजप नेता म्हणाला, दोन्ही भाऊ एकत्र आले तर आनंद होईल. पण निवडणुकीत एकत्र आल्यानंतर पुढेही ते एकत्र राहिले तर खूपच चांगली गोष्ट आहे. राज-उद्धव यांच्यावर निशाणा साधत भाजप नेता पुढे म्हणाला, आमच्या मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नाही. अजून एक वर्षांचा कालावधी पूर्ण व्हायचा आहे. पण काही मंत्री चुकीचं वक्तव्य करून अडचणी निर्माण करतात. पण आम्ही त्यांना समजावतो. पुण्यातील प्रकरणावर बोलताना ते म्हणाले, शनिवार वाडा येथे नियमांचं पालन झालं पाहिजे. जे नियमांच्या विरोधात असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. विरोधी पक्ष निवडणुकीसाठी तयार नाहीय. त्यामुळे निवडणूक टाळून ते व्होटर लिस्टला टार्गेट करत आहेत. त्यांनी काही समस्या असेल, तर त्यांनी तशाप्रकारच्या हरकती नोंदवल्या पाहिजेत, असंही या नेत्यानं म्हटलं आहे.
नक्की वाचा >> Viral : गर्लफ्रेंडचा फोटो बघताच बापाची सटकली, आई ढसाढसा रडू लागली अन्..एका परफ्युममुळे मुलाचं घाणेरडं कांड आलं समोर!
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world