डोंबिवलीजवळील ग्रामीण भागात तलवार गँगची दहशत, सीसीटीव्ही व्हीडिओ आला समोर

आता डोंबिवलीच्या ग्रामीण भागात तलवार गँगने धुमाकुळ घातला आहे. रात्रीच्या वेळी ही गँग तोंडावर रुमाल बांधून, हातात तलवार घेऊन फिरत असते.

Advertisement
Read Time: 2 mins
कल्याण:

पुण्यातल्या कोयता गँगची चर्चा सर्वत्र आहे. या कोयता गँगची दहशत पुण्या बरोबर पिपंरी चिंचवडच्या रहिवाशांनीही अनुभवली आहे. पण आता डोंबिवलीच्या ग्रामीण भागात तलवार गँगने धुमाकुळ घातला आहे. रात्रीच्या वेळी ही गँग तोंडावर रुमाल बांधून, हातात तलवार घेऊन  फिरत असते. त्यांची ही दृष्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात  कैद झाली आहेत. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ही गँग का फिरतेय? कोणाला सावज करतेय? याचा पोलीस शोध घेते आहे. मानपाडा पोलीस अनेक दिवसांपासून या गँगच्या मागवर असून  सीसीटीव्हीच्या आधारे याचा शोध सुरु आहे.डोंबिवलीजवळील घरडा सर्कल येथील आजदेपाडामध्ये टोळी पळत असताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

ट्रेंडिंग बातमी -  Ajit Pawar : जीवात जीव आहे तोपर्यंत संविधानाला धक्का लागू देणार नाही : अजित पवार

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेकडील घरडा सर्कल येथील आजदेपाडा येथे बुधवार 10 तारखेला रात्री 3 वाजण्याच्या सुमारास तलवार गँग पळताना एका इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. ही गँग परराज्यातून आली असून रात्रीच्या वेळी रिक्षा चोरते. चोरी करताना गँग तोंडावर रुमाल बांधून हातात तलवार घेऊन जाते. पोलीस या टोळीच्या मागावर असून लवकरच ही टोळी गजाजाड होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - '10 दिवसात उत्तर द्या अन्यथा...', IAS पूजा खेडकर यांच्या आईला पुणे पोलिसांकडून नोटीस

डोंबिवली ग्रामीण भागात नागरिक घाबरले असून पोलिसांनी आजदेपाडा येथे रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे. या टोळी मुळे डोंबिवली आणि परिसरात भीतीचे वातावरण आहे. मात्र कुणीही घाबरून जावू नये. सतर्क राहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

Advertisement