Nashik TCS Case Update: नाशिक जिल्ह्यात टीसीएस कंपनीबाबत दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता, एका नवविवाहित महिलेने या अग्रगण्य आयटी कंपनीच्या नाशिक शाखेत काय घडत होते, याबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. या नवविवाहित महिलेने पोलिसांना दिलेल्या वैयक्तिक साक्षीतून कार्यालयात काम करणाऱ्या तरुण महिलांना सहन कराव्या लागणाऱ्या क्रूरतेचा उलगडा झाला आहे.
पीडितेने दिलेल्या जबाबानुसार, जून 2025 मध्ये तिची 'असोसिएट' पदावर नियुक्ती झाली होती. तिचे 3 महिन्यांचे प्रशिक्षण 24 जून 2025 रोजी सुरू झाले. शाहरुख कुरेशी आणि जयेश गुंजल हे तिचे प्रशिक्षण प्रमुख होते.
प्रशिक्षणादरम्यान, लोन डिपार्टमेंटचा टीम लीडर, रझा मेनन, ज्याचा प्रशिक्षणाशी काहीही संबंध नव्हता, तो प्रशिक्षण कक्षात माझ्याकडे वारंवार येऊन माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारायचा. "तुझा नवरा बाहेरगावी आहे, तू एकटी कशी राहतेस? तुला भीती वाटत नाही का? तुला काहीही गरज लागल्यास मला सांगा. मी कधीही मदत करेन" असं म्हणायचा.
(नक्की वाचा- TCS Nashik Case: वरिष्ठांचा छळ आणि लैंगिक शोषण का सहन केलं? एका पीडितेबाबत मन सुन्न करणारी माहिती समोर)
'प्लेयर' असे टोपणनाव
रझा मेनन तिला हनीमूनला कुठे गेली होतीस? तिथे काय केले? असे अत्यंत खासगी आणि अश्लील प्रश्न विचारायचा. तिला 'प्लेयर' असे टोपणनाव देऊन तिची छेड काढली जायची. या सगळ्यात ट्रेनिंग लीडर शाहरुख कुरैशी याने तिला मदत करण्याऐवजी उलट आरोपीला प्रोत्साहन दिले.
शारीरिक छेडछाड आणि 'झिरो फिगर'चे कमेंट्स
पीडितेने सांगितलं की, सप्टेंबर 2025 मध्ये ऑन-जॉब ट्रेनिंग सुरू झाल्यावर आसिफ अंसारी नावाच्या कर्मचाऱ्याने देखील तिचा छळ सुरू केला. आसिफने एकदा माझ्या पोटाला आणि कमरेला स्पर्श करत म्हटलं की, "तुझी फिगर झिरो आहे." एकदा, मी बाहेर गॅलरीत (पॅसेजमध्ये) उभी असताना, आसिफ आला आणि त्याने अचानक मला अश्लील पद्धतीने घट्ट मिठी मारली. मी त्याला दूर ढकलून पळून गेले. तो रोज विनाकारण माझ्याकडे यायचा, अश्लील हावभाव करायचा. "आतमध्ये काय घातले आहे?" असे विचारण्यापर्यंत या आरोपींची मजल गेली होती.
आसिफ नेहमी माझ्याकडे बघायचा आणि म्हणायचा, मी तुला आवडत नाही का? मी तुझ्या नवऱ्यापेक्षा जास्त देखणा आहे. माझ्यासोबत बाहेर चल. तुझा नवरा इथे नाहीये. काही झालं तरी कोणाला कळणार नाही आणि तू कोणाला सांगू नकोस. जेव्हा मी जेवायला जायचे, तेव्हा तो वेळ बघून माझ्या शेजारी बसायचा आणि माझ्या मांडीवर हात ठेवायचा. तो म्हणायचा, लग्नाआधी तुझे बॉयफ्रेंड होते, मग अजून एक ठेवण्यात काय हरकत आहे? तुझं लग्न झालं असलं तरी मला काही हरकत नाही."
(नक्की वाचा- Dadar Railway Station: दादर स्थानकात मोठा बदल होणार, प्लॅटफॉर्म क्रमांकही बदलणार)
धार्मिक भावनांना ठेस आणि अपमानास्पद वागणूक
आरोपी आसिफ अंसारी याने केवळ लैंगिक शोषणच केले नाही, तर पीडितेच्या धार्मिक भावनाही दुखावल्या. "तुमच्या धर्मात स्त्रिया बुर्का घालत नाहीत म्हणून त्यांचे बलात्कार होतात," अशा प्रकारचे हीन विधान करून त्याने पीडितेचा मानसिक छळ केला. मकर संक्रांतीला साडी नेसून आलेल्या पीडितेच्या ब्लाऊजच्या दोरीवरूनही अश्लील टिप्पण्या करण्यात आल्या.
'तौसीफ' आणि 'रझा' कडून पदर ओढण्याचा प्रयत्न
मार्च 2026 मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी साडी नेसून आलेल्या पीडितेचा पदर रझा मेमन याने ओढला. पीडितेने सांगितलं की, मी पॅन्ट्रीसमोरील लॉबीतून बाहेर पडत असताना, कोणीतरी माझा पदर ओढत असल्याचे मला जाणवले. मी मागे वळून पाहिले, तर रझा माझा पदर धरून उभा होता. मी तो लगेच मागे खेचला, आणि त्याने माझ्याकडे तिरस्काराने पाहिले आणि हसला. नंतर, मी काम करत असताना, तौसीफ आला आणि माझ्याभोवती एक फेरी मारून म्हणाला, "तू इतकी सुंदर दिसतेस, म्हणूनच तुझ्या पतीने तुझ्याशी लग्न केले आहे." त्याच दिवशी, शफी शेखसुद्धा माझ्याकडे पाहत आणि निघून जात तीन-चार वेळा माझ्या जवळून गेला.
ट्रेनिंगदरम्यान म तौसीफकडे काम शिकायला जायचो, तेव्हा तो मला शिकवण्याचे नाटक करत आपला गाल माझ्या गालाला टेकवायचा, माझ्या खांद्यावर हात ठेवायचा आणि माझा हात व मांडी कुरवाळायचा. जेव्हा मी विरोध करायचो, तेव्हा तो म्हणायचा, "तुला पुढे जायचं नाही का? माझं शिकवणं तुला आवडत नाही का? असं म्हणत तो आणखी जवळ येण्याचा प्रयत्न करायचा.
पाच जणांविरोधात आरोप
जून 2025 ते मार्च 2026 या कालावधीत, नाशिक येथील टीसीएस कंपनीत नोकरी करत असताना, शाहरुख कुरेशी, रझा मेमन, आसिफ अन्सारी, तौसीफ अत्तार आणि शफी शेख यांनी माझा पाठलाग करून, अश्लील टिप्पणी करून, मला चुकीचा स्पर्श करून आणि माझ्याकडे वाईट नजरेने पाहत माझा छळ केला. त्यामुळे पीडितेने शाहरुख कुरेशी, रझा मेमन, आसिफ अन्सारी, तौसीफ अत्तार आणि शफी शेख यांच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार केली आहे.