Jemimah Rodrigues Father: नुकत्याच झालेल्या महिला T20 वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाची खेळाडू जेमिमा रॉड्रिग्जवर मुंबईतील खार जिमखाना क्लबनं कारवाई केली आहे. या क्लबनं जेमिमाचं सदस्यत्व रद्द केलंय. खार क्लबनं जेमिमाच्या वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत. जेमिमाचे वडील धर्मांतरणाच्या कार्यक्रमासाठी खार जिमाखान्याच्या जागेचा आरोप केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे क्लबनं टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचं सदस्यत्व रद्द केलं आहे.
'इंडियन एक्स्प्रेस'नं याबाबत दिलेल्या वृत्तानुसार जेमिमाच्या वडिलांकडून क्लबच्या जागेत होत असलेल्या कार्यक्रमावर जिमखानाच्या अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर अधिकाऱ्यांनी याबाबत कठोर कारवाई करत जेमिमाचं सदस्यत्व रद्द केलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
खार जिनखान्याचे अध्यक्ष विवेक देवनानी यांनी दिलेल्या माहितीनुसार जेमिमाला या जिमखान्याचे तीन वर्षांचे मानद सदस्यत्व देण्यात आले होते. हे सदस्यत्व 20 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत रद्द करण्यात आले.
खार जिमखाना नियमन समितीचे सदस्य शिव मल्होत्रा यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, '
खार जिमखान्यातील घटनेच्या कलम 4 A नुसार क्लबमध्ये कोणत्याही प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांना मनाई आहे.
खार जिमखान्याचे माजी अध्यक्ष नितीन गडेकर यांनी सांगितलं की, आम्हाला एका कर्मचाऱ्यांनी क्लबमध्ये होत असलेल्या कार्यक्रमाबाबत सांगितलं. त्यानंतर मी शिव मल्होत्रा आणि अन्य काही सदस्य तो कार्यक्रम पाहण्यासाठी गेलो. आम्ही पाहिलं की, हॉलमध्ये अंधार होता. ट्रान्स संगीत वाजत होतं. एक महिला तो आपल्याला वाचवण्यासाठी येत आहे, असं सांगत होती. क्लब या प्रकारच्या कार्यक्रमांना कशी परवानगी देतं? याचं मला आश्चर्य वाटलं. आम्ही या प्रकाराला विरोध केला. त्यानंतर सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
( नक्की वाचा : पाकिस्तानी क्रिकेटपटूचा झाला भारतीय हिंदू मुलीशी साखरपुडा, लग्नानंतर मुलगी स्विकारणार इस्लाम! )
जेमिमा रॉड्रिग्ज तसंच तिच्या वडिलांनी या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, अशी माहिती 'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तात देण्यात आली आहे.