भारतामधील आणखी एक मुलगी पाकिस्तानच्या क्रिकेटपटूशी लग्न करणार आहे. पूजा बोमन असं या भारतीय मुलीचं नाव आहे. पूजा अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरात राहते. पूजानं पाकिस्तानचा 32 वर्षांचा क्रिकेटपटू रझा हसनसोबत साखरपुडा केला आहे. न्यूयॉर्कमध्येच या दोघांचा साखरपुडा झाला.
रझा हसननं 'इन्स्टाग्राम'वर पूजासोबतचा फोटो शेअर करत त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली आहे. या दोघांनी समुद्रकिनारी हा फोटो काढलाय. त्यामध्ये रझा हसननं लाल रंगाचा कुर्ता घातलाय. तर पूजा वाइन कलरच्या पंजाबी ड्रेसमध्ये आहे. पूजानं साखरपुड्याची अंगठी घातल्याचंही या फोटोमध्ये दिसत आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हसननं या फोटो कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'मी लग्नासाठी विचारलं आणि ती हो म्हणाली! मी साखरपुडा केला आहे, हे सांगताना मला आनंद होतोय. मी माझ्या प्रेमाला पूर्ण आयुष्य एकत्र घालवणार का? हा प्रश्न विचारला. त्यावर ती हो म्हणाली. नव्या प्रवासासाठी आम्ही उत्सुक आहोत.'
मीडिया रिपोर्टनुसार, रझा हसन आणि पूजा बोमण जानेवारी 2025 मध्ये लग्न करणार आहेत. याबाबत प्रसिद्ध झालेल्या मीडिया रिपोर्टनुसार भारतीय हिंदू असलेली पूजा लग्नानंतर इस्लाम धर्माचा स्विकार करणार आहे.
हसनची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
डावखुरा फिरकी बॉलर असलेल्या रझा हसननं सप्टेंबर 2012 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 मॅचमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानं 10 T20 मॅचमध्ये 10 विकेट्स घेतल्या. ऑक्टोबर 2014 साली त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तीच त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधील पहिली आणि एकमेव वन-डे ठरली आहे.
( नक्की वाचा : Babar Azam : बाबर आझमनंतर पाकिस्तानचा कॅप्टन होण्यासाठी 'हा' खेळाडू आघाडीवर )
यापूर्वी कुणी केलं पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी लग्न?
भारतीय मुलींनी पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी लग्न करण्याची इतिहास जुनाच आहे. अभिनेत्री रिना रॉयनं 1980 साली पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहसीन खानशी लग्न केलं होतं. रिता लुथरानं पाकिस्तानी बॅटर झहीर अब्बासबरोबर 1988 साली लग्न केलं. रितानं लग्नानंतर इस्लाम धर्म स्विकारला.
टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा माजी कॅप्टन शोएब मलिक यांचं लग्न चांगलंच गाजलं. त्या दोघांनी 2010 साली लग्न केलं होतं. आता त्यांचा घटस्फोट झाला आहे. पाकिस्तानचा फास्ट बॉलर हसन अलीनं शामिया आरजूसोबत 2019 साली लग्न केलं आहे. या यादीमध्ये आता पूजा बोमण-रझा हसन यांची भर पडली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world