Women's Day 2025 : मुक्त मी...दिवसभर करा मोफत प्रवास; पुण्यातील महिलांना परिवहन विभागाचं गिफ्ट

पुण्यातील महिलांसाठी परिवहन विभागाकडून खास गिफ्ट देण्यात आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune Metropolitan Transport Board : शनिवारी जागतिक महिला दिनानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. महिलांचं महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्यासाठी अगदी कार्यालयांपासून सोसायटींपर्यंत विविध कार्यक्रम आखण्यात आले आहे. दरम्यान पुण्यातील महिलांसाठी परिवहन विभागाकडून खास गिफ्ट देण्यात आलं आहे. या दिवशी महिलांना पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. प्रवासासाठी त्यांना कोणतंही तिकीट काढण्याची गरज नसेल.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जागतिक महिला दिनानिमित्त म्हणजेच 8 मार्चला महिलांना तेजस्विनी ही बस सेवा मोफत असणार आहे, अशी माहिती पुणे महानगर परिवहन मंडळाने दिली आहे. महिला दिनानिमित्ताने तेजस्विनी ही बस सेवा पुणे आणि पिंपरी चिंचवड मधल्या 13 मार्गांवर महिलांना मोफत सेवा देणार आहे. महिला दिनी या बसच्या 42 फेऱ्या होणार असल्याची माहिती आहे.  

नक्की वाचा - Maharashtra State Board : राज्यभरात एकाच वेळी सुट्ट्या आणि परीक्षाही; राज्य मंडळाकडून एकसमान दिनदर्शिका

कुठे करू शकाल मोफत प्रवास?
कात्रज ते हाउसिंग बोर्ड, कात्रज ते कोथरूड डेपो, स्वारगेट ते हडपसर, निगडी ते हिंजवडी, भोसरी ते निगडी, स्वारगेट ते धायरेश्वर, कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन, एनडीए गेट ते मनपा, हडपसर ते वारजे माळवाडी, भेकराईनगर ते मनपा, मार्केट यार्ड ते पिंपळे गुरव, पुणे स्टेशन ते कोंढवा खुर्द, आणि चिखली ते डांगे चौक या 13 मार्गांवर बस सेवा मोफत असेल.  

Advertisement

त्या सोबतच पीएमपी प्रशासनाकडून तेजस्विनी बसमध्ये महिला वाहकांची नेमणूक करणे आणि त्यासोबतच आगार प्रमुखांनी मार्गावरील बसस्थानकावर उपस्थित राहून महिलांना पुष्पगुच्छ देण्याचे आदेश दिले आहेत.