वणीच्या घाटात टेम्पोला अचानक लागली आग, 19 प्रवासी बचावले

नाशिक सप्तश्रुंगी गडावरील घाटात अपघात झाला आहे. रात्री उशिरा हा अपघात झाला. या यात एका टॅम्पोला अचानक आग लागली.

जाहिरात
Read Time: 1 min

नाशिक सप्तश्रुंगी गडावरील घाटात अपघात झाला आहे. रात्री उशिरा हा अपघात झाला. या यात एका टॅम्पोला अचानक आग लागली. आग लागली तेव्हा टेम्पोमध्ये 19 प्रवासी होते. आगा लागताच टेम्पोतील सर्व भाविक तातडीने खाली उतरले. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. सर्वच प्रवाशांनी प्रसंगावधान राखल्या मुळे मोठी दुर्घटना टळली.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सप्तश्रुंगीगडावर भावीत जात होते. टेम्पोने हे सर्व भाविक जात होते. त्यात 9 महिला,9 पुरूष आणि चालक या टेम्पोमध्ये होता. ही गाडी घाटातून वर चढत होती. त्यावेळी ही आग लागली. आग लागल्याचे चालकाला समजताच त्याने गाडी जागेवरच थांबवली. त्यानंतर सर्व भावीक तातडीने खाली उतरले.आगीने बघता बघता सर्व गाडीला आपल्या कवेत घेतले. आग वाढत जात होती. त्याच वेळी तिथे असलेले स्थानिक ग्रामस्थ आणि रोप वे चे कर्मचारी मदतीसाठी धावून आले. त्यांनी प्रवाशांना बाजूला केले. गाडीला लागलेली आग विझवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. ही गाडी शिर्डीवरून वणीकडे जात होती. 

हेही वाचा - 'सचिन तेंडुलकरने भारतरत्न परत करावा, नाही तर...' बच्चू कडूंचा थेट इशारा