Tesla Showroom in Mumbai : टेस्ला कारची टेस्ट ड्राईव्ह घेता येणार, नव्या कारची किंमत माहिती आहे का?

भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा ऑटो मार्केट आहे. येथे इलेक्ट्रिक वाहनांची (EV) मागणी वेगाने वाढत आहे. सरकार इलेक्ट्रिक वाहनांना देखील प्रोत्साहन देत आहे आणि टेस्लाचे आगमन या क्षेत्रात एक नवीन क्रांती आणू शकते.

जाहिरात
Read Time: 3 mins

Tesla Showroom in Mumbai : टेस्लाचं भारतातील पहिलं शोरूम आज (15 जुलै) मुंबईत सुरू होत आहे. मुंबईतील बीकेसीमध्ये या भव्य शोरूमचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलं. 

या कार्यक्रमात कंपनी आपल्या कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर इलेक्ट्रिक SUV मॉडेल Y (Compact crossover electric SUV Model Y) देखील लॉन्च करणार आहे. कंपनीने दावा केला आहे की, ही कार एकदा फुल चार्ज केल्यानंतर 575 किलोमीटरपर्यंत धावेल. इलेक्ट्रिक कार दोन व्हेरिएंट लाँग रेंज ऑल व्हील ड्राइव्ह आणि लाँग रेंज रियर व्हील ड्राइव्हमध्ये येते. अमेरिकेच्या मार्केटमध्ये याची सुरुवातीची एक्स-शोरूमची किंमत 46,630 डॉलरपासून सुरू होते. भारतात याची किंमत साधारण 48 ते 50 लाखांपर्यंत असू शकते. (Tesla's first showroom in India is in Mumbai)

50 लाखांपर्यंत SUV मॉडेल Y...
गेल्या काही महिन्यांत, टेस्लाने भारतात 10 लाख डॉलरहून जास्त किमतीची इलेक्ट्रिक वाहने, चार्जर आणि अॅक्सेसरीज आयात केल्या आहेत. कंपनीने हे अमेरिका आणि चीनमधून आयात केले आहे. या रिपोर्टच्या कागदपत्रांनुसार, यात कंपनीची बेस्ट सेलिंग मॉडेल Y च्या सहा युनिटचा समावेश आहे. या कॉम्पॅक इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर एसयुव्हीची किंमत 27 लाखांहून (आयात कराव्यतिरिक्त) अधिक असेल मात्र यावर तब्बल 21 लाखांचा आयात कर आणि टॅक्सनंतर ग्राहकांना हा मॉडेल 50 लाखांच्या जवळपासपर्यंत मिळू शकेल. 

टेस्लाच्या कारसंबंधित प्रश्न - उत्तरं...

टेस्ला कारची बुकिंग आणि डिलिव्हरी केव्हापासून सुरू होईल?

मिळालेल्या माहितीनुसार, 15 जुलैपासून ग्राहक गाडी ऑर्डर करू शकतात. ऑगस्टपर्यंत कारची डिलिव्हरी सुरू होऊ शकते. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, पहिल्या टप्प्यासाठी पाच मॉडेल Y कार शांघाईच्या फॅक्टरीमधून आयात करण्यात आले आहेत. भारतात याची किंमत साधारण 48 ते 50 लाखांपर्यंत असू शकते. यामध्ये 21 लाखांच्या जवळपास आयात कर आहे. 

Advertisement

टेस्ला भारतात सध्या कोण-कोणत्या कार विकणार?

टेस्ला भारतात आपला सुरुवातीचा मॉडेल 3 आणि मॉडेल Y सारख्या कारची विक्री करू शकतात. हे दोन्ही मॉडेल लोकप्रिय आणि परवडणारे पर्याय आहेत. मात्र अद्याप याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. भविष्यात मॉडेल S किंवा सायबरट्रॅक सारखे अन्य मॉडेलही भारतात आणले जाऊ शकतात. 

मुंबईशिवाय भारतात इतर शहरांमध्येही टेस्लाचं शोरूम सुरू होणार?

टेस्लाचा पहिला शोरूम मुंबईत सुरू होत आहे. यानंतर दिल्लीत दुसरं शोरूम सुरू होणार असल्याती शक्यता आहे. टेस्ला सध्या या दोन शहरांवर लक्ष केंद्रीत करीत आहे. या शोरूममध्ये गाडींबद्दलची माहिती दिली जाईल. येथे केवळ डिस्प्ले नसेल तर सेल्स, सर्विस आणि स्पेयर पार्टसची सोय असेल. टेस्ला स्वत: हे सांभाळणार आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Tesla India launch : टेस्लाच्या भारतातील पहिल्या शोरुमचं आज मुंबईत उद्घाटन, CM फडणवीसांची उपस्थिती

टेस्ला भारतात आल्यामुळे ऑटो मार्केटवर काय परिणाम होईल?

Advertisement

भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा ऑटो मार्केट आहे. येथे इलेक्ट्रिक वाहनांची (EV) मागणी वेगाने वाढत आहे. सरकार इलेक्ट्रिक वाहनांना देखील प्रोत्साहन देत आहे आणि टेस्लाचे आगमन या क्षेत्रात एक नवीन क्रांती आणू शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र उच्च आयात शुल्कामुळे किंमती चिंतेचा विषय आहेत.

टेस्लाची भारतातील कोणत्या कारशी स्पर्धा?

टेस्लाचा भारतातील टाटा मोटर्स, महिंद्रा सारख्या स्थानिक कंपन्यांसोबत स्पर्धा असेल. याशिवाय बीवाईडी, बीएमडब्ल्यू, ऑडी आणि मर्सिडिज सारखे ब्रँड्सची देशीर टेस्लाशी स्पर्धा असेल. टेस्लाची टेक्नॉलॉजी आणि ब्रँड मूल्य याला इतरांपेक्षा वेगळं ठरवते. मात्र स्थानिक कंपन्यांची किंमत आणि सर्विस नेटवर्क मोठं आव्हान असेल. 

शोरूमचं भाडं 35 लाख महिना..

कंपनीने काही महिन्यांपूर्वीच मुंबईतील बीकेसीत चार हजार चौफूटच्या रिटेल स्पेससाठी पाच वर्षांचा करार केला आहे. हे ठिकाणी अॅपलच्या फ्लॅगशिप स्टोअरच्या जवळ आहे. रिपोर्टनुसार याचं भाडं साधारण 35 लाख रुपये प्रतिमहिना आहे. जे भारतातील सर्वात महाग कमर्शियल रेंटपैकी एक आहे. या शोरूममध्ये टेस्लाच्या प्रीमियम इलेक्ट्रिक वाहनं डिस्प्लेसाठी असतील. विशेष म्हणजे येथे ग्राहकांना टेस्ट ड्राइव्हची संधीही मिळेल.