रिझवान शेख, प्रतिनिधी
Thane Metro News : राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये ज्या शहरांची झपाट्यानं वाढ झाली त्यामध्ये ठाणे शहराचा समावेश आहे. ठाण्याचा गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्यानं विस्तार झाला आहे. वाढती लोकसंख्येप्रमाणेच शहरात वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी ही ठाणेकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलीय. सामान्य ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी शहरात मेट्रो रेल्वेचं काम सुरु करण्यात आलंय. ठाणेकरांचं मेट्रोचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.
ठाणेकरांचं मेट्रोचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. सप्टेंबर महिन्यात एमएमआरडीए ट्रायलची तयारी करत आहे. आज (सोमवार, 25 ऑगस्ट) मेट्रोचे काही डबे या मार्गावर ठेवण्यात आले. काही डबे रात्री या मार्गावर ठेवण्यात येतील. हा उन्नत मार्ग असल्याने क्रेनच्या मदतीने मेट्रो डबे ट्रॅकवर ठेवण्यात आले
ठाण्यातील मेट्रो मार्गिका 4-4 अ मधील 10 स्टेशनवर ही ट्रायल रन होणार आहे. मेट्रो लाईन -4 मेट्रो रेल्वे स्टेशनचं काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आलं आहे. यामधील 10.5 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यात ट्रायल रन घेण्यात येणार आहे.
( नक्की वाचा : ठाण्याजवळ उभारला जाणार सर्वात मोठे मेट्रो डेपो, वाचा संपूर्ण माहिती )
ठाणे मेट्रोची 10 स्टेशनं कोणती?
ठाणे मेट्रोची 10 स्टेशन देखील निश्चित झाली आहेत. या स्टेशनवर ही ट्रायल रन होणार आहे. ठाणे मेट्रोची 10 स्टेशनांची नावं खालीलप्रमाणे
1) कॅडबरी
2) माजीवाडा
3) कपूरबावाडी
4) मानपाडा
5) टिकूजी -नी -वाडी
6) डोंगरी पाडा
7) विजय गार्डन
8) कासरवाडावली,
9) गोवानिवाडा
10) गायमुख
कसा आहे ठाणे मेट्रोचा मार्ग?
मेट्रो 4 ही 32.32 किमी तर मेट्रो चार अ ही 2.7 किमी लांबीची मार्गिका आहे. या दोन्ही मार्गिंकांवर मिळून 32 स्टेशन असणार आहेत. तीन टप्प्यात विभागलेला वडाळा ते कासारवडवलीपर्यंत विस्तारित मार्ग जवळपास 80 टक्के पूर्ण झाला आहे. कासारवडवली ते कॅडबरी जंक्शन हा पहिला भाग डिसेंबर 2025 पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर 2026 मध्ये कॅडबरी जंक्शन ते गांधीनगर हा भाग आणि 2027 मध्ये वडाळा हा शेवटचा भाग तयार होईल. कासारवडवली ते गायमुख यांना जोडणारा ग्रीन लाइन 4 A विस्तार 90 टक्के पूर्ण झाला असून या वर्षाच्या अखेरीस तो सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे शहरातील पहिली मेट्रो या वर्षाच्या शेवटी धावण्याची शक्यता आहे.