Thane News : ठाणे पालिकेची पहिली CBSE शाळा सुरू होणार; काय आहेत खास वैशिष्ट्ये? वाचा सविस्तर

Thane News : ठाणे महानगरपालिकेने शिक्षण क्षेत्रात एक मोठे पाऊल उचलले असून, सामान्य कुटुंबातील मुलांसाठी आता जागतिक दर्जाच्या शिक्षणाची दारे उघडली आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Thane School : खारेगावमधील सफायर रुग्णालयाजवळ ही शाळा साकारली जात आहे
ठाणे:

Thane News : ठाणे महानगरपालिकेने शिक्षण क्षेत्रात एक मोठे पाऊल उचलले असून, सामान्य कुटुंबातील मुलांसाठी आता जागतिक दर्जाच्या शिक्षणाची दारे उघडली आहेत. खारेगाव येथे महापालिकेची पहिली सीबीएसई (CBSE) बोर्डाची शाळा लवकरच कार्यान्वित होणार असून, या शाळेच्या तयारीचा आढावा नुकताच घेण्यात आला आहे.

कधी सुरु होणार शाळा?

ठाणे महानगरपालिका आणि क्रिस्टल हाऊस इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने खारेगाव येथे ‘ठाणे महानगरपालिका – क्रिस्टल हाऊस' ही सीबीएसई शाळा सुरू होत आहे. येत्या 8 जून 2026 पासून या शाळेचा पहिला शैक्षणिक हंगाम सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, ही शाळा नर्सरी ते इयत्ता 12 वीपर्यंत असणार असून, सुरुवातीला नर्सरी ते दुसरीपर्यंतचे वर्ग भरवले जातील. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज प्रत्यक्ष शाळेच्या कामकाजाचा आढावा घेऊन सर्व तयारी 8 जूनपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

Advertisement

अद्ययावत सोयीसुविधांनी सज्ज इमारत

खारेगावमधील सफायर रुग्णालयाजवळ ही शाळा साकारली जात आहे. पालिकेच्या माध्यमातून शाळेसाठी दर्जेदार पायाभूत सुविधा पुरवल्या जात असून, यामध्ये खालील सोयींचा समावेश असेल.

( नक्की वाचा : Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची Good News तयार, तरीही अधिकृत घोषणा का रखडली? वाचा सविस्तर )

  • अद्ययावत ग्रंथालय आणि विज्ञान प्रयोगशाळा.
  • संगणक कक्ष आणि भाषा प्रयोगशाळा.
  • क्रीडा व कला विभागासाठी स्वतंत्र जागा आणि मुलांसाठी खेळाचे मैदान.
  • पिण्याचे शुद्ध पाणी, सीसीटीव्ही यंत्रणा, लिफ्ट आणि अग्निशमन व्यवस्था.

सध्या इमारतीची रंगरंगोटी, खिडक्यांना ग्रिल बसवणे आणि मैदानाचे काम अंतिम टप्प्यात असून शाळा सुरू होण्यापूर्वी ही सर्व कामे पूर्ण होतील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.


( नक्की वाचा : Monsoon Update: येरे येरे पावसा! मान्सून केरळच्या दिशेने सुसाट; अंदमाननंतर 18 दिवसांनी गाठणार किनारपट्टी )
 

विद्यार्थ्यांना मिळणार मोफत शिक्षण आणि सुविधा

या शाळेची खास बाब म्हणजे, विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक ते 12 वीपर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे. क्रिस्टल हाऊस व्यवस्थापनामार्फत खालील जबाबदाऱ्या पार पाडल्या जातील:

प्रशिक्षित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती.
विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पुस्तके आणि सर्व शैक्षणिक साहित्याचे वाटप.
विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक भोजन आणि शाळेपर्यंत येण्या-जाण्यासाठी वाहतूक सुविधा.
उच्च शिक्षण आणि करिअर मार्गदर्शनासह रोजगाराभिमुख प्रशिक्षणावर विशेष भर.

Advertisement

30 वर्षांचा करार आणि ऐतिहासिक पाऊल

ठाणे महानगरपालिका आणि क्रिस्टल हाऊस यांच्यात 30 सप्टेंबर 2025 रोजी यासंदर्भात 30 वर्षांचा सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम शिकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. महापालिकेच्या या पुढाकारामुळे ठाण्यातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल घडून येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
 

Topics mentioned in this article