Dombivli News: कल्याण-डोंबिवली परिसरातील नागरिकांसाठी वाहतूक आणि पाणीपुरवठा संदर्भात महत्त्वाच्या सूचना ठाणे पोलिसांनी आणि पाणीपुरवठा विभागाने जाहीर केल्या आहेत. डोंबिवली पूर्वेकडील कोळेगाव भागात सुरू असलेल्या मुख्य पाणी पाइपलाइन बदलण्याच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
वाहतुकीत बदल
ठाणे पोलिसांनी जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 12 व्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत कोळेगाव येथे मुख्य पाइपलाइन बदलण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे कोळेगाव चौक-प्रीमियर मैदान-कल्याण शिल रोड मार्गावरील वाहतुकीवर परिणाम होणार आहे. हे वाहतूक बदल 9 डिसेंबरच्या रात्री 12 वाजेपासून ते 21 डिसेंबरच्या पहाटे 1 वाजेपर्यंत लागू राहतील.
(नक्की वाचा- साईबाबा आणि बालाजी भक्तांसाठी खूशखबर! शिर्डी-तिरुपती एक्सप्रेस सुरु, राज्यात 11 ठिकाणी थांबणार गाडी)
पर्यायी मार्ग
कोळेगाव चौकाकडून प्रीमियर मैदानाकडे येणारी वाहने
बंद केलेला मार्ग- कोळेगाव चौकातून प्रीमियर मैदान, कल्याण शिल गेटकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने थांबवली जातील.
पर्यायी मार्ग - ही वाहने बदलापूर पाइपलाइनमार्गे रोहाणे काटाई बदलापूर चौक या दिशेने जातील आणि तिथून पुढे त्यांच्या इच्छित स्थळी प्रवास करू शकतील.
(नक्की वाचा- Solapur News: स्मशानभूमीत 'रात्रीस खेळ चाले'; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण)
कोळेगावहून कोळेगाव चौकाकडे येणारी वाहने
बंद केलेला मार्ग - कोळेगावातील शिवसेना शाखेसमोरून कोळेगाव चौकाकडे येणारी सर्व वाहनांना प्रवेश बंद असेल.
पर्यायी मार्ग - ही वाहने प्रीमियर मैदानाच्या जवळून कल्याण शिल रोडमार्गे हनहट ठिकाणाकडे जातील.
डोंबिवलीतील पाणी कपातीची माहिती
पाणीपुरवठा आज सकाळी 9 वाजल्यापासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. यामुळे डोंबिवली पूर्व आणि डोंबिवली पश्चिम या दोन्ही भागांतील अनेक भागांवर परिणाम झाला आहे.